Monday 11 September 2023

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने आणला मुंबईतील पहिला आणि भारतातील अशाप्रकारचा पहिला प्रगत डिजिटल PET-CT स्कॅनर

~ ही अत्याधुनिक डिजिटल PET-CT इमेजिंग सिस्टिम रुग्णकेंद्रित सेवा प्रदान करत, कॅन्सरविरोधातील लढ्यातील लक्षणीय प्रगती दर्शवते आणि शरीरात झालेले इतर लीजन शोधून काढते. ~
मुंबई, 11 सप्टेंबर २०२३:  कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक बायोग्राफ ६४, व्हिजन ६०० - PET CT स्कॅनर इन्स्टॉल करण्यात आला आहे. त्यामुळे आता हे हॉस्पिटल सर्वात नवीन डिजिटल PET/CT इमेजिंग तंत्रज्ञान प्रस्तुत करणारे या भागातील पहिले हॉस्पिटल बनले आहे. शरीरातील हानिकारक पेशी, गाठी आणि इतर लीजन लवकरात लवकर शोधून काढू शकणारे हे तंत्रज्ञान आणून हॉस्पिटलने कॅन्सरविरोधातील लढ्यात लक्षणीय झेप घेतली आहे.
डिजिटल PET-CT इमेजिंग हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान कॅन्सर ओळखून त्यावर उपचार केले जाण्यात क्रांती घडवून आणत आहे. अधिक जास्त अचूकतेसह अतुलनीय संवेदनशीलता यांनी परिपूर्ण असे हे तंत्रज्ञान अगदी छोट्यात छोटे लीजन देखील शोधून काढू शकते, जे पारंपरिक इमेजिंग पद्धतींमार्फत करण्यात आलेल्या शोधात राहून गेलेले असू शकते. अशाप्रकारे आजार लवकरात लवकर शोधून काढून आणि प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट आजारानुसार, गरजांनुसार उपचार पर्याय देऊन रुग्णाला मिळणाऱ्या परिणामात सुधारणा घडवून आणता येऊ शकते.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये डिजिटल PET-CT इन्स्टॉल करण्यात आल्यामुळे मेडिकल प्रोफेशनल्स आणि रुग्ण या दोघांनाही अनेक वेगवेगळे लाभ मिळतील. या तंत्रज्ञानामध्ये असलेली अतिशय अचूक आणि सर्वसमावेशक इमेजिंग उपलब्ध करवून देण्याची क्षमता हा यातून मिळणारा सर्वात महत्त्वाचा लाभ असेल. यामुळे डॉक्टरांना आजार कसा, किती व कुठे वाढत आहे याची अजून जास्त माहिती मिळेल. वेगवेगळे स्कॅन्स करत राहण्याची गरज कमी होईल, सहाजिकच रुग्णांचा रेडिएशनशी कमीत कमी संपर्क येईल आणि एकंदरीत निदान प्रक्रिया देखील कमी होईल. डॉक्टरांकडे अतिशय अचूक आणि व्यापक माहिती उपलब्ध असल्यामुळे त्यांना प्रत्येक रुग्णाचा आजार, इतर स्थिती आणि गरजा यानुसार उपचार योजना ठरवता येईल, त्यामुळे थेरपीमधून अधिकाधिक अनुकूल परिणाम मिळू शकतील.
आधीच्या काळातील ऍनालॉग PET-CT स्कॅनरच्या तुलनेत डिजिटल PET-CT मधून मिळणारे लाभ 
डिजिटल PET-CT मध्ये अधिक सुस्पष्ट आणि उत्कृष्ट इमेजेस मिळतात, आजाराचे अतिशय अचूक निदान केले जाण्यासाठी तसेच आजाराचा नेमका टप्पा ओळखण्यासाठी हे फार आवश्यक आहे. 
ऍनालॉग PET CT मध्ये ८ mn पर्यंतच्या आकाराचे ट्युमर ओळखता येत होते तर डिजिटल PET CT मध्ये अगदी ३ mn इतक्या खूप लहान आकाराचे ट्युमर ओळखता येण्यासाठी अधिक जास्त रेजोल्यूशन असते. 
डिजिटल PET CT मध्ये स्कॅनिंगसाठी कमी वेळ लागतो, आधीच्या पद्धतीमध्ये एका रुग्णाच्या स्कॅनिंगसाठी १५ ते २० मिनिटे वेळ लागत असे तर यामध्ये अवघ्या ७ ते ८ मिनिटात स्कॅनिंग केले जाते. 
या स्कॅनरमध्ये सर्व शरीर आकाराचे रुग्ण सामावू शकतात, त्यामुळे आता रुग्णांच्या शरीराचा आकार कसाही असो, स्कॅनिंगचा निकाल अचूक मिळतो. 
ही अतिशय जास्त संवेदनशील सिस्टिम आहे, त्यामुळे रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट कराव्या लागणाऱ्या रेडिओऍक्टिव्ह मटेरियलचे प्रमाण कमी असते, रुग्णांना स्कॅनसाठी जास्त रेडिएशनला सामोरे जावे लागत नाही.
न्यूक्लियर मेडिसिन आणि PET-CT चे कन्सल्टन्ट आणि हेड डॉ अंशू शर्मा म्हणाले, "डिजिटल PET-CT इमेजिंगचा उपयोग केला जावा यावर मी खूप जास्त भर देतो याची अनेक कारणे आहेत. हे तंत्रज्ञान आजार किती, कुठे व कसा वाढत आहे हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी डॉक्टरांना सक्षम बनवते, त्यांना रुग्णांवर उपचार करण्याच्या बाबतीत अधिक माहितीपूर्ण निर्णय घेता येतात. ऍनालॉग PET-CT सहित पारंपरिक इमेजिंग तंत्रांमध्ये जे ट्युमर लक्षात येऊ शकत नाहीत ते देखील या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ओळखता येतात त्यामुळे परदेशात याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ही पूर्णपणे सुरक्षित प्रक्रिया आहे आणि डिजिटल PET-CT प्रगत रिकन्स्ट्रक्शन अल्गोरिदम वैशिष्ट्य स्कॅनसाठी लागणारा वेळ आणि रुग्णांच्या शरीरात इंजेक्ट करावे लागणाऱ्या रेडिएशनचे प्रमाण कमी करण्यात मदत करते, यामुळे रुग्णांची सुरक्षितता वाढते."
डिजिटल PET CT च्या लॉन्च प्रसंगी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ संतोष शेट्टी यांनी सांगितले, "डिजिटल PET CT स्कॅनर आल्यामुळे आपल्या रुग्णांना सर्वोत्तम आरोग्य सेवा पुरवण्याप्रती आणि तंत्रज्ञानात प्रगती घडवून आणण्याप्रती कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलची बांधिलकी अधिक दृढ झाली आहे.  या प्रगत तंत्रज्ञानामुळे आम्ही आमच्या वैद्यकीय टीम्सना रुग्णांच्या आजारांचे निदान करण्यासाठी व त्यांच्यावर प्रभावी उपचार करण्यासाठी सर्वोत्तम साधने पुरवण्याच्या वचनबद्धतेमध्ये पुढचे पाऊल उचलले आहे. आम्ही फक्त तंत्रज्ञानात गुंतवणूक करत नाही तर आमचे रुग्ण आणि आरोग्य क्षेत्राच्या भविष्यात गुंतवणूक करत आहोत."
कॅन्सर ओळखणे आणि त्यावरील उपचार यांच्या व्यतिरिक्त डिजिटल PET-CT हे न्यूरॉलॉजी आणि कार्डिओलॉजी यासारख्या विविध वैद्यकीय क्षेत्रांमध्ये एक मौल्यवान साधन ठरले आहे.  या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हाय-रेजोल्यूशन इमेजेस मिळतात ज्यामुळे डॉक्टरांना आजार, त्याचा नेमका टप्पा यांचे अचूक निदान करता येते आणि उपचारांना रुग्ण कसा प्रतिसाद देत आहे ते नीट समजून घेता येते, त्यामुळे न्यूरॉलॉजी, कार्डिओलॉजी आणि ऑन्कोलॉजी या क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त अनुकूल देखभाल पुरवता येते. कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा ट्युमरचा आकार खूप लहान असतो तेव्हा हे तंत्रज्ञान खूप उपयोगी ठरते. डिटेक्टर तंत्रज्ञानात प्रगतीमुळे डिजिटल PET-CT सिस्टिम्समध्ये अधिक चांगले स्पेशियल रेजोल्यूशन असते आणि त्यामुळे रुग्णांसाठी अधिक अचूक व प्रभावी उपचार योजना ठरवता येतात.

No comments:

Post a Comment