Wednesday 25 October 2023

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये क्रांतिकारी सर्जरी करून अतिशय दुर्मिळ जायन्ट स्पायनल ट्युमर यशस्वीपणे काढण्यात आला


२००० घन सेमी म्हणजेच एका अंड्यापेक्षा तीस पट मोठा असलेला स्पायनल ट्युमर १० व्हर्टेब्रल लेव्हल्सवर विस्तारलेला होता

 

मुंबई25 ऑक्टोबर2023:  कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमुंबईने वैद्यकशास्त्र आणि समन्वय या दोन्हींमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावत२४ वर्षे वयाच्या रुग्णाच्या शरीरातून अविश्वसनीयदुर्मिळ आणि अवाढव्य असा ग्रेड  मायक्सोपॅपिलरी एपेन्डीमोमा ट्यूमर यशस्वीरित्या काढून टाकल्याची घोषणा केली आहे२००० घन सेमी आकाराचाएका अंड्यापेक्षा तीस पट मोठा ट्युमर १० व्हर्टेबल लेव्हल्सवर पसरलेला होताअशा प्रकारचे ट्युमर २० लाखांमध्ये फक्त एकाच व्यक्तीमध्ये आढळून येतातही सर्जरी पाच दिवसांत तीन महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये करण्यात आलीया तीन टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या सुपर-स्पेशालिटीजनी दररोज आठ तासांपेक्षा जास्त वेळ काम करून सर्जरी यशस्वी करून दाखवली.

 

मायक्सोपॅपिलरी एपेन्डीमोमा हा एक दुर्मिळ प्रकारचा स्पायनल ट्यूमर आहेजो प्रामुख्याने फिलम टर्मिनलमध्येम्हणजे पाठीच्या कण्याला पायथ्याशी स्थिर करणाऱ्यातंतुमय ऊतकांच्या नाजूक स्ट्रॅन्डमध्ये होतोहे ट्यूमर एपेंडीमल पेशींपासून उद्भवतातया पेशी पाठीच्या कण्याच्या मध्यवर्ती कालव्याला जोडतात आणि सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (CSF) चे उत्पादन आणि प्रवाह नियंत्रित करताततसेच मेंदूच्या चयापचय आणि टाकाऊ पदार्थ साफ करण्याच्या प्रक्रियेवर देखील परिणाम करतातट्युमरच्या जागी वेदना होणेसुन्नपणा येणे आणि अर्धांगवायू अशी याची लक्षणे जाणवतात जी ट्यूमरचा आकार आणि स्थान यावर अवलंबून असतात.

ही सर्जरी पाच दिवसांत तीन महत्त्वाच्या टप्प्यांत करण्यात आलीतीन टप्प्यांमध्ये विविध सुपर स्पेशालिटीजनी त्यांच्या कौशल्याचा यशस्वी वापर केला  इच्छित परिणाम घडवून आणले.

सर्वात पहिली अँटेरियर स्टेजज्यासाठी डॉमंदार नाडकर्णीकन्सल्टन्टसर्जिकल ऑन्कोलॉजीहेड - ब्रेस्ट ऑन्कोलॉजी आणि सर्जन - कोलोरेक्टल ऑन्कोलॉजीडॉअत्तार इस्माईलकन्सल्टन्टयूरोलॉजी आणि रेनल ट्रान्सप्लांट सर्जनआणि डॉरघुराम शेखरकन्सल्टन्टवस्क्युलर आणि एंडोव्हस्कुलर सर्जरी या तज्ञांनी काम केले.

दुसरी पोस्टरिअर स्टेजजिचे नेतृत्व डॉमनित गुंदवडा आणि डॉअभय कुमार यांनी केलेअंतिम टप्पा रिकन्स्ट्रक्शनचा होताज्यामध्ये डॉकाझी गझवान अहमदकन्सल्टन्टप्लास्टिक सर्जरी यांनी सॉफ्ट टिश्यूना रिकन्स्ट्रक्ट केलेडॉराजेश मिस्त्रीडायरेक्टरऑन्कोलॉजीडॉअभय कुमारहेडन्यूरोसर्जरी आणि कन्सल्टन्टमिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरीआणि डॉमनित गुंदवडाकन्सल्टन्टऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी यांच्यासमवेत प्रक्रियेची बारकाईने योजना करण्यासाठी ट्यूमर बोर्ड तयार करण्यात आला.

 

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमुंबईचे सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ संतोष शेट्टी यांनी सांगितले, "आमच्या हॉस्पिटलमध्ये फुल टाइम स्पेशालिस्ट सिस्टीम (FTSS) मॉडेल आहे आणि तोच सर्वात मोठा फायदा आहेत्यामुळेच अशा प्रकारच्या गंभीर शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहेरुग्ण-केंद्रित दृष्टिकोन ठेवून दुर्मिळ आणि अत्यंत जटिल ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी प्रक्रिया करणे सहयोगी सांघिक दृष्टिकोनामुळे शक्य झालेप्रचंड आव्हानात्मक असून देखील स्पायनल ट्यूमर काढून टाकण्यात यश मिळालेहे यश कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील वैद्यकीय टीमच्या कौशल्यसमर्पण आणि एकत्र मिळून समन्वयपूर्वक केलेल्या प्रयत्नांची साक्ष आहे.”

प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची होतीरुग्णाची तब्येत स्थिर राहावी यासाठी भूलतज्ञअतिदक्षता पथक आणि रक्तपेढी यांचे व्यापक साहाय्य आवश्यक होतेसर्जरीदरम्यान तीस युनिट्सपेक्षा जास्त रक्त किंवा रक्त उत्पादने वापरली गेली.

No comments:

Post a Comment