पुणे, 19 डिसेंबर 2023: पियाजिओ वेईकल्स प्रा. लि. (पीव्हीपीएल) ही इटालियन ऑटो कंपनी
पियाजिओ ग्रुपची १०० टक्के मालकीची उपकंपनी आणि भारतातील स्मॉल कमर्शियल वेईकल्सची
आघाडीची उत्पादक कंपनी १ जानेवारी २०२४ पासून त्यांच्या तीन-चाकी इंटर्नल कम्बशन
इंजिन (आयसीई) वाहनांच्या आपे ब्रॅण्डच्या किमतीमध्ये वाढ करणार आहे. प्रमाणित
किंमत वाढ डिझेल, सीएनजी, एलपीजी व पेट्रोलमध्ये कार्गो आणि पॅसेंजर आपे वेईकल्सना लागू
असेल. भारतातील सध्याच्या एक्स-शोरूम किंमतीमध्ये साधारण ६००० रूपयापर्यंतची
वाढ करण्यात येईल.
आपले मत व्यक्त करत पियाजिओ
वेईकल्स प्रा. लि. येथील सीव्ही डॉमेस्टिक बिझनेस (आयसीई) व रिटेल फायनान्सचे
कार्यकारी उपाध्यक्ष श्री. अमित सागर म्हणाले, ''यंदा सणासुदीच्या काळात
आमच्या तीन-चाकींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, जेथे विक्रीमध्ये ३८
टक्क्यांहून अधिक वाढ झाली. सीएनजीच्या पूर्ण भरलेल्या ४०-लीटर टाकीमध्ये
उद्योगामध्ये पहिल्यांदाच ३०० किमीपर्यंतची रेंज देणारी आपे एनएक्सटी+ सारख्या
नवीन सादर करण्यात आलेल्या वाहनांनी देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले, ज्यामुळे आमच्या
प्रॉडक्शन लाइन्स व्यस्त होत्या. आम्हाला उत्पादनामध्ये वाढ होत राहण्याची
अपेक्षा आहे, ज्याचे श्रेय आपे वेईकल्सच्या
अविश्वसनीय व उच्च-कार्यक्षम श्रेणीला जाते आणि ही सुविधा आपेच्या कोणत्याही
इंधन प्रकाराच्या वेईकल्समध्ये मिळते.''
ते पुढे म्हणाले, ''२०२३ मध्ये महामारीच्या प्रादुर्भावामधून
बाहेर पडल्यानंतर आम्ही महागाई व कच्च्या
माल
खर्चाच्या परिणामाचा सामना करत असताना,
ग्राहकांसाठी किमतीमध्ये कोणतीही वाढ केली नव्हती. आपेच्या प्रमाणित किंमतीमध्ये
१ जानेवारी २०२४ पासून वाढ होणार असल्यामुळे आम्ही ग्राहकांना ३१ डिसेंबर २०२३
पर्यंत विद्यमान किमतीचा अधिकाधिक फायदा घेण्याचे आवाहन करतो. शेवटी, आपे उद्योजकांसाठी सर्वोत्तम वेईकल व व्यवसाय
सहयोगी ठरली आहे.''
३ दशलक्षहून अधिक ग्राहकांचा विश्वास असलेला व्यावसायिक तीन-चाकींचा आपे ब्रॅण्ड २५ वर्षांपासून लोकप्रिय आहे. २०२३ ची सांगता होत असताना ग्राहकांनी भारतातील जवळच्या पियाजिओ डिलरशिपमध्ये जाऊन ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत त्यांच्या आवडीची आपे सर्वोत्तम व कमी किंमतीत खरेदी करण्याचा आनंद घ्यावा.
No comments:
Post a Comment