Sunday, 9 June 2019

बिग बॉस मराठीच्या घरामधून मैथ्थिली जावकर बाहेर...मला या घरामध्ये दोन भाऊ मिळाले

मुंबई ९ जून२०१९ कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ हे पर्व बरेच चर्चेमध्ये आहे... अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धक त्यांच्या भांडणाने, वाद – विवादाने घर गाजवत आहेत...ईथे अवघ्या बारा तेरा दिवसामध्ये ग्रुप्स देखील तयार झाले आहेत... बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, विणा जगतापमैथिली जावकर, माधव देवचके आणि नेहा शितोळे हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते. आता या सहा जणांमधून आज कोणाला घरा बाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते... शेवटी अभिजीत केळकर आणि मैथ्थिली जावकर हे डेंजर झोन मध्ये होते... आणि महेश मांजरेकर यांनी घोषित केले कि, या आठवड्यामध्ये मैथ्थिली जावकर हीला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागणार आहे. तेंव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? कोण घराचा नवा कॅप्टन बनेल सदस्यांना कोणते टास्क मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर. 
महेश मांजरेकर यांनी घरातून बाहेर आल्यावर मैथ्थिलीला तिच्या घरामधल्या अनुभवाबद्दल विचारलेतेंव्हा ती म्हणाली माझ्यासोबत सगळेच अगदी उद्धटउर्मट अगदी निवडून या घरामध्ये आणले आहेतजे दुसऱ्यांचं अजिबात ऐकत नाहीत. घरामध्ये कोण तुला मित्र म्हणून मिळालं असं विचारले तेंव्हा मैथ्थिलीने सांगितले नेहा सोडून घरामध्ये सगळेच मला जवळचे होते आणि आहेत...सगळ्यांशी माझी घट्ट मैत्री झाली. बिचुकले यांनी मला धाकटी बहीण तर माधवने मला मोठी बहीण म्हंटलमला या घरामध्ये दोन भाऊ मिळाले असे मी म्हणेन.
बिग बॉस मराठीच्या सिझन २ मध्ये घरामधून बाहेर पडणारी पहिली सदस्य मैथ्थिली जावकर ठरली. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल आणि कोण घराबाहेर जाईल हे बघणे रंजक असणार आहे.
तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.  

No comments:

Post a Comment