Thursday 6 June 2019

Mumbai Che Raje end campaign with a win - मुंबई चे राजे संघाचा शेवट विजयाने

Bengaluru: Mumbai Che Raje ended their season 1 campaign on a high, defeating Haryana Heroes 69-53 in the opening match of the Bengaluru leg played at Kanteerva Stadium. Mumbai failed to qualify for the playoffs, finishing 3rd in Group B with 10 points from 9 matches.
Mumbai Che Raje started strong, picking out the opposition defence and inflicting an all-out early in the first half to race to an 11-7 lead. Haryana Heroes did well to bounce back from their shaky start and take out Mumbai Che Raje players in back to back raids to level the scores at 13-13 and eventually take a one-point lead at 17-16 at the end of the first quarter. Mumbai Che Raje suddenly found themselves in a spot of bother as Haryana Heroes enforced another all-out to extend their lead to 6 points at 24-18. Mumbai Che Raje slowly recovered from the early onslaught and fought their way back to reduce Haryana's lead to 2 points at 25-23. Haryana managed to secure their 3rd all out to stay ahead of Mumbai Che Raje with a 31-24 lead at the end of the second quarter.
Mumbai Che Raje came back with renewed focus after the half time and raiders A Arul and Mahesh Magdum made short work of Haryana's defence levelling the scores at 34-34 with 4 minutes to go. Mumbai Che Raje continued with their rampage securing an all-out and taking an 8 point lead at  43-35. With 2 minutes left on the clock, Haryana tried their best but could only secure 2 points,  trailing the 3rd quarter by 9 points at 47-38.
The final quarter was one of the highest-scoring quarters of the match. Mumbai Che Raje took the game away from Haryana with a decisive 65-47 lead. With 4 minutes to go Haryana tried to get back into the game but could manage to score only 6 points helping Mumbai Che Raje win their last league stage match with a commanding 69-53 victory.  
Marathi 

बंगळुरू :   मुंबई चे राजे संघाने इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेचा पहिल्या हंगामाचा शेवट गोड केला. त्यांनी बंगळुरूच्या कांतीरावा स्टेडियममध्ये पार पडलेल्या लेग मधील पहिल्या सामन्यात 69-53 असे हरयाणा हिरोज संघाला 69-53 असे पराभूत केले. मुंबईच्या संघाला प्लेऑफमध्ये मजल मारता आली नाही. ब गटात नऊ सामन्यानंतर 10 गुणांसह ते तिसऱ्या स्थानी राहिले.
    मुंबई चे राजे संघाने चांगली सुरुवात केली. पहिल्या सत्रात प्रतिस्पर्धी संघाला सर्वबाद करत 11-7 अशी आघाडी घेतली. हरयाणा हिरोज संघाने यानंतर पुनरागमन करत सामना 13-13 असा बरोबरीत आणला व पहिले क्वॉर्टरमध्ये 17-16 अशी एका गुणाची आघाडी घेतली.हरयाणा संघाने आपला खेळ उंचावत मुंबईला सर्वबाद केले व 24-18 अशी सहा गुणांची आघाडी घेतली.मुंबईच्या संघाने येथून गुण मिळवत हरयाणा संघाची आघाडी 25-23 अशी कमी केली. पण, हरयाणाने मुंबईला तिसऱ्यांदा सर्वबाद करत दुसऱ्या क्वॉर्टरअखेरीस 31-24 अशी आघाडी घेतली.
    मुंबई चे राजे संघाने ए अरुल व महेश मगदूम यांच्या जोरदार खेळीच्या जोरावर सामना 34-34 असा बरोबरीत आणला.यानंतरही मुंबई चे राजे संघाने आपला हाच फॉर्म कायम ठेवत हरयाणा संघाला सर्वबाद करत 43-35 अशी आठ गुणांची आघाडी मिळवली. हरयाणा संघाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण, तिसऱ्या क्वार्टर अखेरीस मुंबईच्या संघाकडे 47-38 अशी आघाडी होती.
  सामन्यातील शेवटचे क्वॉर्टर हे सर्वाधिक गुणांचे ठरले. मुंबई चे राजे संघाने सुरुवातीलाच 65-47 अशी आघाडी मिळवली. सामना संपण्यास चार मिनिटे शिल्लक असताना हरयाणा संघाचे पुनरागमन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण, त्यांना सहाच गुण मिळवता आले आणि मुंबई चे राजे संघाने सामना 69-53 असा जिंकला.

No comments:

Post a Comment