मराठी नाटक, कथाबाह्य कार्यक्रम इत्यादी अनेक दर्जेदार सादरीकरण 'झी टॉकीज'वर पाहायला मिळतात. अर्थात, मराठी सिनेसृष्टीतील ही सर्वोत्तम वाहिनी, आजही दर्जेदार मराठी चित्रपटप्रेक्षकांसाठी घेऊन येण्यात कुठेही मागे नाही. जुन्या व नव्या चित्रपटांची सांगड घालत, एक उत्तम मेजवानी ही वाहिनी सर्वांसाठी पेश करते. आजवर अनेक मराठी चित्रपटांचे 'वर्ल्ड टेलिव्हिजनप्रीमियर' या वाहिनीवर प्रेक्षकांनी पाहिलेले आहेत. असाच आणखी एक प्रीमियर ऑगस्टच्या पहिल्या रविवारी 'झी टॉकीज' घेऊन येत आहे. 'राक्षस' ही एका त्रिकोणी कुटुंबाची चित्तथरारक कथाआहे. हा चित्रपट, रविवार ४ ऑगस्ट रोजी, दुपारी १२ व संध्याकाळी ६ वाजता, झी टॉकीजवर पाहता येईल.
अविनाश (शरद केळकर) हा एक डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी जंगलात गेलेला असतांना, तो तिथेच हरवतो. त्याच्या काळजीपोटी त्याची पत्नी इरावती (सई ताम्हणकर) व मुलगी अरण्या त्याचा शोधघेण्याचा प्रयत्न करू लागतात. संपूर्ण चित्रपटात, या दोघींची अविनाशला शोधण्यासाठी सुरू असलेली धडपड पाहायला मिळते. चित्रपटात जंगलातील प्रसंग फार महत्त्वाचे असल्याने, या सिनेमाचेबरेचसे चित्रीकरण जंगलात करण्यात आले आहे. मायलेकींचे हे शोधकार्य सुरू असतांना, कथांचे एक पुस्तक त्यांना फार उपयोगी पडते. अरण्या म्हणजेच अरु, बाबांसोबत जंगलात गेलेली असतांना, तिला हे पुस्तक सापडलेले असते. या पुस्तकाच्या आधारे, अविनाश नाहीसे होण्याचे गूढ सोडवण्याचा त्या दोघी आटोकाट प्रयत्न करतात. अर्थात, अविनाशने अदृश्य होण्याव्यतिरिक्त इतर काहीरहस्यांचा उलगडा या शोधकार्यात होत आहे, हे त्या दोघींच्या लक्षात येते.
अविनाशला शोधून काढण्यात या दोघी यशस्वी होतील का? उलगडत जाणारे ते दुसरे रहस्य कुठले असेल, हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका, 'राक्षस' या चित्रपटाचा 'वर्ल्ड टेलिव्हिजनप्रीमियर', फक्त आपल्या लाडक्या 'झी टॉकीजवर'!!
No comments:
Post a Comment