दरवर्षीप्रमाणे झी मराठी प्रस्तुत ‘उंच माझा झोका पुरस्कार २०१९’ याही वर्षी अतिशय प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. यंदाच्या पुरस्काराचे हे सातवे वर्ष आणियावर्षी आपल्या कार्याने समाजाला सुदृढ आणि वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांना त्यांच्या भरीव योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येत्या २५ ऑगस्टला हा सोहळा सायंकाळी ७ वा. ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
स्त्रीशक्तीचा जगण्यातून प्रेरणा मिळते. झगडण्याचं बळ मिळतं. सकारात्मक ऊर्जा मिळते. महाराष्ट्रातील अनेक महिलांनी वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. यातीलअनेकींचं कार्य प्रकाश झोतात आलंय तर काही जणी प्रसिद्धीचा सोस न बाळगता गेल्या अनेक वर्षांपासून आपलं कार्य अविरतपणे करत आहेत. अशाच कर्तृत्ववान स्त्रियांचागौरव ‘उंच माझा झोका पुरस्कार’ देऊन करण्यात येतो.
अग्निशामक दलाची देशातली पहिली महिला अधिकारी होण्याचा मान मिळवलेल्या हर्षिणी कण्हेकर, देशातील पहिल्या महिला कमांडो ट्रेनर सीमा राव, सीडमदर - राहीबाईपोपरे, महाराष्ट्राबाहेर मराठी खाद्यसंस्कृतीचा प्रसार करत मराठी खाद्यपदार्थांचं उपहारगृह उभारणाऱ्या जयंती कठाळे, मुंबई मेट्रो रेल कॅार्पोरेशनच्या व्यवस्थापकीयसंचालक अश्विनी भिडे, चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या, लेखक आणि संपादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अरुणराजे पाटील, गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागातील शाळांमध्येमुलांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या गटशिक्षण अधिकारी अश्विनी सोनावणे यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचा सर्वोत्कृष्ट क्षण ठरला सीमा राव आणि राहीबाई यांच्या पुरस्कार प्रदानाचा. या कार्यक्रमात सादर झालेल्या विविध कलाकारांच्या नृत्य सादरीकरणानेहीउपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने केलं. तसेच या पुरस्कार सोहळ्यात सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थितीदर्शवली.
तेव्हा पाहायला विसरू नका उंच माझा झोका पुरस्कार २०१९ रविवार २५ ऑगस्ट संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर
No comments:
Post a Comment