झी टॉकीज, ही पहिली मराठी चित्रपट वाहिनी आज दहा वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मराठी चित्रपटांसह, नाटक विविध कथाबाह्य कार्यक्रम झी टॉकीजवरून प्रदर्शित करण्यात येतात. म्हणूनच ही वाहिनी प्रेक्षकांची सर्वांत आवडती वाहिनी झालेली आहे. जुन्या व नवीन चित्रपटांचा अनोखा मेळ साधत झी टॉकीजमार्फत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात येते. येत्या रविवारी, म्हणजेच ११ ऑगस्टला ही वाहिनी आणखी एक विशेष चित्रपट सगळ्यांसाठी घेऊन येणार आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या 'बंदिशाळा' या चित्रपटाचा'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर' यादिवशी झी टॉकीजवर होणार आहे. दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता, हा सिनेमा पाहता येईल.
अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत भरडल्या जाणाऱ्या 'माधवी सावंत' या पोलीस अधिकारी महिलेची ही कथा आहे. आपल्या हक्कासाठी व न्यायासाठी ती कशाप्रकारे लढा देते हे चित्रपटात पाहायला मिळते. पुरुषांच्या एकातुरुंगाची सर्वेसर्वा म्हणून माधवी सावंत काम पाहतात. त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांकडून केला जातो. एकीकडे प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराशी लढा सुद्धा त्या करत आहेत. या सगळ्या प्रयत्नांमध्ये त्यांनी स्वतःचे अनेक शत्रू निर्माणकेले आहेत. या सगळ्यांचा सामना करणे त्यांना अधिकाधिक कठीण होऊ लागते. या प्रतिकूल परिस्थितीवर माधवी सावंत मात करू शकतील का? भ्रष्ट प्रशासनाशी असलेला लढा यशस्वी होईल का?
या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी, पाहायला विसरू नका, 'बंदिशाळा', रविवार ११ ऑगस्ट रोजी, दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता, फक्त आपल्या लाडक्या 'झी टॉकीज'वर!!!!
No comments:
Post a Comment