Sunday, 4 August 2019

निर्मितीची अंतिम फेरीत धडक


मुंबई, ऑगस्ट 4 : 
    निर्मिती गजभिये (एमएसडीबीए) हिने चमकदार कामगिरी करत बॉम्बे जिमखाना इन्ड्सइंड बँक सब ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या 13 वर्षाखालील एकेरी व मुलींच्या 15 वर्षाखालील एकेरी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने ही स्पर्धा बॉम्बे जिमखाना बॅडमिंटन कोर्टसवर ही स्पर्धा सुरू आहे.
    मुलींच्या 13 वर्षाखालील गटाच्या उपांत्यफेरीत अव्वल मानांकित निर्मितीने एवाना त्यागीला (एमएसडीबीए) 15-6, 15-7 असे पराभूत केले. अन्य एका उपांत्यफेरीत दुसऱ्या मानांकित रिया विन्हेरकर (जीएमबीए) सानिका सिन्हाला (एमएसडीबीए) 15-12, 15-4 असे नमविले.
    यानंतर निर्मिती गजभियेने अव्वल मानांकित मुलीच्या 15 वर्षाखालील गटात संजीवनी सुर्यवंशी (जीएमबीए) हिला 15-3, 15-9 असे पराभूत केले. तर, दुसऱ्या मानांकित काम्या रवी (एमएसडीबीए) तारुषी यादवला (जीएमबीए) 15-4, 15-5 असे पराभूत केले.मुलींच्या 11 वर्षाखालील गटात रिया विन्हेरकरने आरोही मेजारी (एमएसडीबीए) हिला 15-5, 15-1 असे नमविले. तर, दुसऱ्या मानांकित एवाना त्यागीने  (एमएसडीबीए) दुसऱ्या मानांकित मायरा ओकला (एमएसडीबीए) 15-6, 15-7 असे नमविले.
    मुलांच्या 15 वर्षाखालील गटात प्रणव कांबळे (जीएमबीए) व अक्षीत किरण (एमएसडीबीए) यांच्यातील सामना प्रणवने जिंकला. अक्षीतला काही कारणास्तव 14-15, 15-8, 8-2 अशा स्थितीत सामन्यातून माघार घ्यावी लागली.दुसऱ्या उपांत्यफेरीत लॉयनल मोंटेरिओ (एमएसडीबीए) याने शिवान मिश्राला (एमएसडीबीए) 10-15, 15-11, 15-7 असे नमविले.
मुलांच्या 13 वर्षाखालील एकेरी (उपांत्यफेरी)
- प्रणित सोमानी (एमएसडीबीए) वि. वि. ओसकार मॅथ्यू (एमएसडीबीए) 13-15, 15-8, 15-11 , शाश्वत कुमार (जीएमबीए) वि. वि. आर्यन तलवार (एमएसडीबीए)15-11, 15-10
- मुली 15 वर्षाखालील एकेरी (उपांत्यफेरी): 2-काम्या रवी (एमएसडीबीए) वि. वि. तारुषी यादव (जीएमबीए) 15-4, 15-5 , 1-निर्मिती गजभिये (एमएसडीबीए) वि. वि. संजीवनी सूर्यवंशी (जीएमबीए) 15-3, 15-9

No comments:

Post a Comment