Friday, 9 August 2019

जगदंब क्रिएशन्सचा पूरग्रस्तांना मदतीचा हात


कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले आहेत. यात मराठी सिनेसृष्टीदेखील काही मागे नाही. आतपर्यंत अनेक कलाकारांनी आपापल्यापरीने पूरग्रस्तांना मदत केली आहेच. पण जगदंब क्रिअशन्स या निर्मितीसंस्थेने एक निर्णय घेतला असून आपल्या संस्थेअंतर्गत निर्मिलेल्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' आणि स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकांच्या कलाकार आणि तंत्रज्ञांनी आपले एका दिवसाचे मानधन पूरग्रस्तांना देण्याचे ठरवले आहे. जगदंब क्रिअशन्सच्यावतीने अभिनेते-खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पूरग्रस्तांना या मदतीद्वारे दिलासा देत देशाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

No comments:

Post a Comment