सिने-नाट्य अभिनेते शशिकांत केरकर यांच्या “समर्थ फाऊंडेशन” या सामाजिक संस्थेतर्फे दिनांक १५ ऑगस्ट २०१९ “ इलायची क्रीम..चव आयुष्याची” हा कवी तनवीर सिद्धिकीच्या कथा,कविता आणि गप्पांचा कार्यक्रम पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मिनी थेएटर- प्रभादेवी येथे सकाळी १० ते १२.३० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात सादरकर्ते म्हणून सिने-नाट्य कलावंत पंढरीनाथ कांबळे, शशिकांत केरकर, नंदिता पाटकर,सुशील इनामदार, प्रसाद खांडेकर, वैभव सांगळे, विनोद गायकर हे तनवीर सिद्धिकीसह सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामुल्य असून काही रांगा राखीव आहेत.

No comments:
Post a Comment