Thursday, 8 August 2019

माझ्या आयुष्यात अभिनयाच्या आधी गाणं आलेलं आहे - वैभव मांगले

चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून पडद्यावर दिसणारे  रंगभूमीवर सुद्धा आपल्या अभिनयाची झलक दाखवणारे वैभव मांगले हे आता झी युवा वरील युवा सिंगरएक नंबर या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेतत्यांच्या या नव्या भूमिकेबद्दल साधलेला हा खास संवाद
तुमची ओळख एक उत्तम कलाकार म्हणून आहेपणआता तुम्ही 'झी युवा'वरील 'युवा सिंगर एक नंबरया गायन स्पर्धेच्या परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहातलोकांसाठीही भावना नक्कीच, 'नया हैं यहअशी असेलयाबद्दल तुम्हाला काय वाटतं?
- परीक्षकाची भूमिका मला नक्कीच आवडली आहेप्रेक्षकांसाठी माझी ही नवी भूमिका वेगळी असू शकेलपण माझ्या आयुष्यात अभिनयाच्या आधी गाणं आलेलं आहेआई-वडीलमाझे आजोबा या सगळ्यांकडून माझ्याकडे गाण्याचा वारसा चालत आलेला आहेगाणी ऐकूनत्याचं परीक्षण करणंही फारच सुंदर गोष्ट आहेशिवायपरीक्षण करणंमला मुळातच आवडतंत्यामुळे हा माझ्यासाठी एक अभ्यासाचा विषय आहे असं मी म्हणेन

तुम्ही स्पष्टवक्ते आहातहे संपूर्ण महाराष्ट्र जाणतोपरिक्षण करतांना तुमची भूमिका नक्की कशी असेल?
- मी स्पष्टवक्ता म्हणून प्रसिद्ध आहेहे सगळ्यांनाच ठाऊक आहेकलेच्या बाबतीत कुणीही खोटं बोललेलं मला आवडत नाहीएखाद्या हौशी गायकाला बोलणंहे मलाफारसं गरजेचं वाटत नाहीपणव्यवसाय म्हणून जर कुणी ही कला स्वीकारत असेलतर जिथे तो चुकत असेलतिथे त्याला त्याची चूक दाखवून देणं क्रमप्राप्त असतंचूक सांगितली गेली नाहीतर त्यांचं नुकसान होतंतेवढ्यापुरतं दुःख होत असेलतरीही त्या स्पर्धकाला याचा भविष्यात फायदाच होतोत्यामुळे एखादा जाणकार जरमार्गदर्शन करत असेलतर उद्दामपणेत्याचं म्हणणं डावलून लावणंअजिबातच योग्य नाही
कुठला स्पर्धक तुमच्यासाठी 'एक नंबर'चा असेल  का?
- जो स्पर्धक सुरांची उपासना करतोतो निश्चितपणे महत्त्वाचा ठरतोसंगीतकाराने सांगितलेली चाल लगेचंच जाणून घेता येणं गरजेचं आहेरागातील आरोह-अवरोह,वादी-संवादी सूर योग्यप्रकारे जाणता येणंही कला जमायला हवीअसा गायक पार्श्वगायनासाठी तयार असतोअसाच स्पर्धक माझ्यासाठी 'एक नंबरअसेल

हे व्यासपीठ नवीन लोकांसाठी किती महत्त्वाचे आहे?
- कुठलीही स्पर्धा ही गायकासाठी महत्त्वाचीच असतेअर्थात, 'झी युवा'सारख्या मंचावरील स्पर्धेत सहभागी होणेही मोठी गोष्ट आहेइथून बाहेर पडणारा प्रत्येकचस्पर्धकखूप काही शिकून  यशस्वी होऊन बाहेर पडेलअर्थातही यशाची पहिली पायरी असेल आणि पुढील यशाच्या वाटचालीसाठी 'युवा सिंगरएक नंबर'मधून खूपकाही शिकायला मिळेल
तुम्हाला कोणत्या प्रकारचे संगीत ऐकायला आवडतेतुमचे आवडते गायक कोण आहेत?
- पूर्वीपासूनच मी सुगम संगीत ऐकत आलो आहेलता मंगेशकर माझ्या सर्वांत आवडत्या गायिका आहेतशिवाय शास्त्रीय संगीतही माझी आवडीची गोष्ट आहेअभिजात शास्त्रीय संगीत हे एक भावसंगीत आहे असं मला वाटतंकिशोरी ताईंनी स्वतःचं असं एक घराणं यात निर्माण केलं आहेत्यांचं शास्त्रीय संगीत ऐकणंहीदेखीलएक पर्वणी असतेशास्त्रीय संगीताच्या सुरांमध्ये रमायला सुद्धा मला फार आवडतं
सावनी आणि मृण्मयी या तुमच्या सहकाऱ्यांबद्दल तुम्ही काय सांगाल?
- मृण्मयी देशपांडे ही उत्तम अभिनेत्री  नर्तिका असलेली गुणी कलाकार सूत्रसंचालन करणार आहेकलेची उत्तम जाण असल्याने ती उत्कृष्ट सूत्रधार आहेसावनी शेंडेअभिजात शास्त्रीय संगीतातील एक उत्तम गायिका आहेकिशोरी ताई आमोणकरलता मंगेशकर हे आमचं दोघांचंही भक्तीचं स्थान आहेशिवायकुठल्याहीस्पर्धकाविषयी टिप्पणी करत असतांनाआमची मतं बहुतांशी सारखी असतातइतकं साम्य आमच्यात असल्याने आमची छान गट्टी जमली आहे

No comments:

Post a Comment