Monday 19 August 2019

बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वातला स्पर्धक माधव देवचके ठरला ‘विजेता’

बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वात स्पर्धक म्हणून गेलेला अभिनेता माधव देवचकेने जरी ट्रॉफी जिंकली नसली तरीही प्रेक्षकांची मनं जिंकली. यारों का यार म्हणून ओळखला जाणारा माधव देवचके बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच त्याला शोमॅन सुभाष घईंचा चित्रपट मिळाला आहे. सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्स ह्या चित्रपट निर्मिती संस्थेच्या अमोल शेडगे दिग्दर्शित विजेता ह्या सिनेमात माधव देवचके मुख्य भूमिकेत दिसेल.
नुकताच माधवच्या विजेता सिनेमाचा मुहूर्त झाला. सिनेमाच्या मुहूर्ताला सुभाष घईंसह सुबोध भावे , पुजा सावंत, सुशांत शेलार हे सिनेमातले अन्य कलाकारही उपस्थित होते. विजेता चित्रपटाच्या चित्रीकरणालाही आता सुरूवात झाली आहे. ह्याविषयी माधव देवचके म्हणाला, “बिग बॉस केल्यानंतर लगेचच सुभाष घईंसारख्या मोठ्या फिल्ममेकरचा सिनेमा मिळाला, हे माझे भाग्यच म्हणायला हवे.  सुभाष घईंसारख्या दिग्गज फिल्ममेकरच्या सिनेमात काम करायला मिळणं ही निश्चितच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आजवर त्यांचे सुपरडूपर हिट सिनेमे पाहतच मी लहानाचा मोठा झालोय. आणि आता त्यांच्या मुक्ता आर्ट्सच्या बॅनरच्या चित्रपटात काम करायला मिळणं, हे जणू स्वप्नवतच.”

No comments:

Post a Comment