'दिल, दोस्ती, दुनियादारी' आणि 'एका लग्नाची दुसरी गोष्ट', या मालिका तुम्हाला नक्कीच आठवत असतील! आपल्या सगळ्यांच्या लाडक्या या मालिका पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळणार आहे. १६ डिसेंबरपासून, सोमवार ते शनिवार, संध्याकाळी ७ ते ८ या वेळात या दोन्ही मालिकांचे पुनःप्रक्षेपण 'झी युवा' वाहिनीवर होणार आहे. 'ऑल्वेज युवा'च्या मार्फत वाहिनी ही पर्वणी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.
'झी युवा' नेहमीच प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आले आहे. तरुणाईला आवडेल असं झकास कन्टेन्ट विविध मालिकांच्या माध्यमातून, या वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहे. 'झी युवा'ने नेहमीच तरुणाईला आकर्षित केले आहे. त्यांच्यासाठी ढासू मालिकांची खास मेजवानी, दर्जेदार कथाबाह्य कार्यक्रम दाखवण्याचा वाहिनीचा प्रयत्न असतो. या झकास मनोरंजनाचा आणखी एक भाग, म्हणजेच 'ऑल्वेज युवा'!! मनोरंजनाकडे पाहण्याचा तरुणाईचा नवा दृष्टिकोन लक्षात घेऊन 'आहे. 'दिल, दोस्ती, दुनियादारी' आणि 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या दोन एव्हरग्रीन मालिका, संध्याकाळी, अनुक्रमे ७ आणि ७.३० वाजता 'झी युवा'वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
सहा मित्रांची एक अनोखी गोष्ट असणारी, 'दिल, दोस्ती, दुनियादारी' ही मालिका तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली होती. आधी अनोळखी असलेले आणि योगायोगाने एकत्र आलेले हे सहाजण, पुढे एकमेकांचे घनिष्ठ मित्र कसे बनून गेले, हे अत्यंत रंजक पद्धतीने या मालिकेतून मांडण्यात आले आहे. या सहा जणांचं, जणू एक कुटुंब होऊन जातं, एकमेकांच्या सुख-दुःखात वाटेकरी होत ते आयुष्यात पुढे वाटचाल करत राहतात. हे षट्कोनी कुटुंब, महाराष्ट्रातील सर्वच कुटुंबाचं लाडकं झालं होतं. या सहा जणांना पुन्हा भेटण्याची संधी 'झी युवा'देत आहे.
कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या बोलीवर एकत्र आलेले राधा आणि घना सुद्धा प्रेक्षकांनी पाहिले. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ते प्रेम असा सुंदर प्रवास करणारी ही जोडी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत ठरली आहे. 'चुकून घडलेल्या' त्यांच्या प्रेमकहाणीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या दोन्ही मालिकांच्या संकल्पना अत्यंत भन्नाट आणि आगळ्यावेगळ्या होत्या. म्हणूनच, 'ऑल्वेज युवा'मधून पुन्हा एकदा या मालिका प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. प्रेक्षक या मालिकांचा मनमुराद आस्वाद घेतील यात शंकाच नाही.
आपल्या दर्जेदार कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी वाहिनी, त्यांच्यातील खट्याळ तारुण्य जपून ठेवण्याचं सुद्धा काम करते. यातीलच एक उपक्रम म्हणून 'ऑल्वेज युवा' प्रेक्षकांचे झकास मनोरंजन करणार आहे. १६ डिसेंबरपासून संध्याकाळी ७ ते ८ या वेळात या आनंदसागरात भिजून जायला विसरू नका.
No comments:
Post a Comment