तुमच्यामध्ये जर अभिनयाचा किडा असेल, जर तुम्हाला अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी एक उत्तम मंच हवा असेल, जर तुम्हाला मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून मार्गदर्शन हवं असेल. तर फक्त आणि फक्त तुमच्यासाठी तो चक्क ९ वर्षांनी परत येतो आहे. आता हा तो कोण आहे? हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर तो म्हणजे 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या कार्यक्रमाचा मंच.
या कार्यक्रमाने ९ वर्षांपूर्वी अनेक उदयोन्मुख कलाकारांसाठी उत्तम मंच उपलब्ध करून दिला. या मंचाने अनेक कलाकार देखील दिले आहेत जे आज त्यांच्या कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. अभिनय क्षेत्रात येण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला हवा हवासा असलेला हा मंच पुन्हा एकदा येतोय हि सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावेळी देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक टॅलेंटेड युवकांना आपली कला सादर करण्याची हि सुवर्ण संधी मिळेल. या मंचावरून पुढे आलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर नव्या पर्वाच सूत्रसंचालन करताना पाहायला मिळेल.
लवकरच या कार्यक्रमासाठी ऑडिशन्स सुरु होणार आहेत. सर्वात पहिलं ऑडिशन औरंगाबाद शहरात १४ डिसेंबर रोजी होणार आहे. ऑर्किड टेक्नो स्कुल, १४/१४०, सिडको, वाळुंज महानगर, वाळुंज, औरंगाबाद - ४३११३६ या ठिकाणी सकाळी ९ ते दुपारी ४ च्या दरम्यान ऑडिशन्स होतील.
No comments:
Post a Comment