चौकटीबाहेरचा विचार करत सातत्याने वैविध्यपूर्ण कलाकृती देणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये समित कक्कड यांचे नाव आवर्जून घेतले जाते. ‘हुप्पा हुय्या’, ‘आयना का बायना’, ‘हाफ़ तिकीट,’ ‘आश्चर्यचकीत’ यांसारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट देणाऱ्या समित यांनी ताकदीचा आशय आणि तेवढ्याच ताकदीची तांत्रिक सफ़ाई दाखवून आपल्या चित्रपटांचा दर्जा सातत्याने उंचावत नेला. त्यामुळेच त्यांच्या आगामी चित्रपटांविषयी कायमच उत्सुकता राहिली आहे. त्यांचा ‘३६ गुण’ हा चित्रपट नवीन वर्षात म्हणजेच २०२० साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाच्या पोस्टरची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे.
लेखकाला नक्की काय सांगायचंय? याबाबत दिग्दर्शकाचा दृष्टिकोन स्पष्ट असेल तर या दोघांच्या समीकरणातून घडणारी कलाकृती नक्कीच आशयघन ठरते. अशाच समीकरणातून लेखक हृषिकेश कोळी आणि दिग्दर्शक समित कक्कड यांचे जुळलेले ’३६ गुण’ त्यांच्या चित्रपटांतूनही दिसून येताहेत. या दोघांच्या सॅालिड कॉम्बीनेशन’ चा ‘३६ गुण’ प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट असणार याची खात्री बाळगायला हरकत नाही.
लेखक दिग्दर्शकाची कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला चांगले नट असतील तर त्या कलाकृतीला ‘चारचाँद’ लागतात. ‘३६ गुण’ या चित्रपटात संतोष जुवेकर व पूर्वा पवार हे दोघे युवा कलावंत मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून आजच्या तरुण पिढीच्या नातेसंबंधाच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या दृष्टीकोनातून भारतीय लग्नसंस्थेवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. मुंबई आणि लंडनमधील तब्बल ९० नयनरम्य लोकेशन्सवर हा सिनेमा चित्रीत झालेला असल्याने आतापर्यंत न पाहिलेले लंडन आणि वेगळा विषय ही प्रेक्षकांसाठी ‘स्पेशल ट्रीट’ ठरणार आहे.
‘समित कक्कड फ़िल्म्स’ व ‘द प्रॊडक्शन हेडक्वार्टर्स लि’ प्रस्तुत आणि समित कक्कड, मोहन नाडार, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड निर्मित सिनेमाचं छायाचित्रण प्रसाद भेंडे यांचे आहे.
First Look of Samit Kakkad’s ‘36 GUNN’ Released.
There are directors who consistently give varied art works, one such director whose name is always mentioned is Samit Kakkad. Samit Kakkad had earlier directed the much acclaimed and award winning films like ‘Aayna ka Bayna’, ‘Half Ticket’ and ‘Ascharya Chak It’, each one of them of a different genre, each one with a very strong intent and equally strong technical brilliance, thus raising the bar repeatedly. Hence there has always been a lot of expectation from his movies. His new movie 36 Gunn is going to release next year in 2020. The First look of the Poster was recently released.
If the director has a clear perspective then the outcome of this equation will definitely be an intense work of art. This kind of equation between writer Hrishikesh Koli and director Samit Kakkad will be seen in the film 36 Gunn. There is no harm in assuming that there is going to be something crazy and original in 36 Gunn for cine-goers.
If there are good actors to take the art of the writer and director to the audience, that would be a fantastic thing. Santosh Juvekar and Purva Pawar, two young actors are playing the central role in the movie 36 Gunn.
The movie comments on the mentality of relationships of today’s youth and their perspective on the marriage system. The movie has been shot at 90 locations in London and Mumbai. This might prove to be a ‘special treat’ for the viewers as they would be able to see many new places which they might not have seen earlier.
The movie is presented by ‘Samit Kakkad Films’ and ‘The Production Headquarters Ltd.’.
The movie is produced by Samit Kakkad, Mohan Nadar, Santosh Juvekar and Savitri Vinod Gaikwad. The cinematography is by Prasad Bhende.
Director : Samit Kakkad
Writers : Hrishikesh Koli - Samit Kakkad
Presenters : Samit Kakkad Films - The Production Headquarters Ltd
Producers : Samit Kakkad - Mohan Nadar - Santosh Juvekar - Savitri Vinod Gaikwad.
No comments:
Post a Comment