Wednesday, 4 December 2019

झी गौरव कौतुक सोहळ्याचे वेध

मोठा पडदा आणि रंगभूमी ही अनेक कलाकारांसाठी खास असतेसिनेमा आणि रंगभूमीवर या माध्यमांमध्ये काम करण्याची प्रत्येक कलाकाराला उत्सुकता असतेएखाद्या संवादाला पुढच्याच क्षणी मिळणारी रसिकांची टाळी ऐकणं ही तर कलाकारासाठी त्याच्या कामाची पावतीचमराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीसाठी मानाचा समजल्या जाणाऱ्या झी गौरव २०२० पुरस्काराचे वेध सगळ्यांना लागले आहेतया पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया  डिसेंबर पासून सुरु झाली आहेनाट्यकर्मींचानाट्यसंस्थांचा तसेच सिनेसृष्टीत मोलाचं योगदान करणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यासाठी झी मराठी वाहिनी गेल्या अनेक वर्षांपासून कौतुक सोहळा आयोजित करतेझी चित्र गौरव आणि झी नाट्य गौरव पुरस्काराचा तो नेत्रदीपक सोहळानव्या नाटकांमधील विषयांचे वैविध्यप्रयोगदिग्दर्शकांची कमाल आणि प्रचंड उत्सुकतेनंतर मिळणारा उत्कृष्टतेचा मुकूट हे सगळचं अनोखं.  
झी नाट्यगौरव पुरस्काराच्या नामांकनयादीत स्थान मिळवण्यासाठी यंदा चांगलीच चुरस आहेयावर्षीचे देखील  सर्वोकृष्ट प्रायोगिक नाटकाला झी तर्फे  लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहेझी मराठी नेहमीच मराठी नाटकांना प्रोत्साहन देत आली आहेया स्पर्धेत भाग घेणाऱ्यांसाठी  लाखाचे पहिले पारितोषिक नक्कीच आणखी मेहनत घेण्याचे कारण ठरेलया पुरस्कारासाठी नोंदणी करण्यासाठी अंतिम तारीख ३१ डिसेंबरपर्यंत आहेचित्र गौरव पुरस्कारांच्या नावनोंदणीसाठी https://zeemarathi.zee5.com/zcgp2020/ या लिंकवर अर्ज उपलब्ध आहेत तसंच नाट्य गौरव पुरस्कारांसाठी https://zeemarathi.zee5.com/zngp2020/ या लिंकवर भेट देऊन नावनोंदणी करू शकतात.

No comments:

Post a Comment