Tuesday, 3 December 2019

दोन स्पेशलच्या मंचावर दिसणार “शिंदेशाही बाणा”


काय आहे उत्कर्ष शिंदेच्या सुपरहिट गाण्यामागचे गुपित ?
मुंबई ३ डिसेंबर, २०१९ : कलर्स मराठीवरील दोन स्पेशलच्या मंचावर या आठवड्यामध्ये लोककलेची पिढीजात परंपरा यशस्वीरीत्या सांभाळणारा आजचा आघाडीचा, प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे येणार आहेत... आदर्श आणि उत्कर्ष मंचावर येणार म्हणजे गाणी सादर होणारच... आदर्शने देवा तुझ्या गाभार्‍याला हे गाणे सादर केले आहे... तर उत्कर्षने देखील काही गाणी सादर केली... लहनापणीच्या काही आठवणी, किस्से या मंचावर दोघांनी सांगितले आहेत. जितेंद्र जोशी याने दोघांना विचारले तुमच्या दोघांमध्ये आनंद शिंदें यांचा लाडक कोण आहे ? यावर आदर्शने लागलीच उत्तर दिले “उत्कर्ष जास्त लाडका आहे असे तो का म्हणाला ? हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा विशेष भाग. दोन भावांनी एकमेकांबद्दलच्या अशा अनेक मजेशीर आठवणी, किस्से सांगितले आहेत... दोन स्पेशलचा हा विशेष भाग ६ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर प्रेक्षेपित होणार आहे.
जितेंद्र जोशी यांनी उत्कर्षला जेंव्हा त्यांच्या आई वडिलांचा फोटो दाखविला तेंव्हा तो म्हणाला, “माझ्या आईचं हास्य दिलखुलास आहे, माझ्या आईचे खूप प्रेम आहे माझ्या वडीलांवर ती आजसुध्दा माझ्या वडिलांना हाताने जेवण भरवते”. यावर आदर्श शिंदेने काय सांगितले आणि अजून कोणकोणते प्रश्न विचारले हे कळेलच... तर उत्कर्षला त्याची बहुतेक गाणी बाथरूममध्ये सुचतात याचे काय रहस्य आहे ? असे विचारले... आदर्श म्हणाला त्याने बाथरूममध्ये लिहिलेली सगळी गाणी सुपरहिट आहेत...तर, एक प्रश्न उत्तरांचा गेम देखील खेळण्यात आला ज्यामध्ये दोघांना प्रश्न विचारण्यात आला, कधी ब्रेकअप झालं आहे का ? यावर दोघांनी काय उत्तर दिले हे जाणून घेण्यासाठी बघा हा विशेष भाग ६ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 

No comments:

Post a Comment