मयूर वैद्य, हा सेलिब्रिटी मं डळींचा कोरिओग्राफर म्हणून आपल् याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. 'झी युवा' वाहिनीवर ११ डिसेंबर पासून बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता प्रसारित होणाऱ्या 'युवा डान्सिंग क्वीन' या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो परिक्षकाच्या खुर्चीत बसलेला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या निमित्ताने त्याच्याशी मारलेल् या या गप्पा;
१. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमा च्या निमित्ताने तू पहिल्यांदाच 'झी युवा'सोबत काम करत आहेस, त्या विषयी काय वाटतं?
झी परिवारासोबात माझं नातं जुनं आहे. 'युवा डान्सिंग क्वीन'च्या निमि त्ताने 'झी युवा' सोबत काम करायची संधी मिळते आहे. ही माझ्यासाठी नक्कीच एक आनंदाची गो ष्ट आहे. परीक्षकाची भूमिका मला इथे निभवायची आहे. या वाहिनीमु ळे मला ही संधी मिळाली आहे. 'झी युवा'ने दिलेल्या संधीचा पु रेपूर फायदा करून घेऊन, प्रेक् षकांच्या मनात माझी एक खास जागा निर्माण करण्याचा प्रयत्न मी न क्कीच करेन.
२. सोनाली कुलकर्णी तुझ्यासोबत परीक्षण करणार आहे. तिच्याविषयी काय सांगशील?
फार पूर्वी मी सोनालीच्या एका डा न्ससाठी कोरिओग्राफी केली होती. त्यानंतर आम्ही एकत्र काम केले ले नाही. पण, आमच्यात खूप छान मै त्री झालेली आहे. आम्ही दोघे पहि ल्यांदाच एकत्रपणे एका स्पर्धे चे परीक्षण करत आहोत. आम्ही एका स्क्रीनवर पहिल्यांदा दिसणार अ सल्याने, त्याविषयीची उत्सुकता आणि आनंद मनात आहेच. आमचं मैत् रीचं नातं खूपच छान आहे. पण, परी क्षण करत असताना कधीतरी एकवाक् यता तर कधीतरी निराळे विचार असे अनुभव घ्यायला मिळतील. आम्ही ए कत्र काम करणार आहोत याचा खूप आ नंद आहे. परीक्षण करण्याव्यतिरि क्त खास काहीतरी प्रेक्षकांसाठी पेश करण्याचा आमचा प्रयत्न नक् कीच असेल.
३. स्पर्धकांचे परीक्षण करण्या साठी कुठले मुद्दे तुझ्यादृष्टी ने महत्त्वाचे असतील?
स्पर्धकांच्या परीक्षणात मी फा रच बारकाईने लक्ष घालणार आहे. या तारकांना, आजवर प्रेक्षकांनी नि राळ्या भूमिकेत पाहिलेले आहे, प ण डान्सिंग क्वीन म्हणून त्या या स्पर्धेत सहभागी होतील, तेव्हा त्यांचे वेगळे व्यक्तिमत्व पा हायला मिळावे अशी अपेक्षा असणार आहे. त्यांनी निवडलेली थीम ही नृत्याला योग्य असणे गरजेचे आहे . या थीमला योग्य अशी हेअरस्टा ईल, वेशभूषा या गोष्टी सुद्धा अ सणे माझ्यादृष्टीने आवश्यक आहे. वेगवेगळ्या एपिसोड्समधील सादरी करणात कुठेही साधर्म्य असू नये याची काळजी स्पर्धकांनी घेणे अत्यं त आवश्यक आहे. कुठलीही गोष्ट कर त असताना, नृत्याला न्याय दिला गेला पाहिजे. नृत्य सादर करत अस ताना त्यात सहजता असली पाहिजे, अशी सुद्धा माझी अपेक्षा आहे.
४. या कार्यक्रमाची संकल्पना खा स आणि वेगळी आहे. त्याविषयी तु झे मत काय आहे?
या कार्यक्रमाची संकल्पना खरो खरंच खूप वेगळी आहे. नृत्याच्या स्पर्धेला एका वेगळ्या स्तरावर पोचवण्याचा 'युवा डान्सिंग क् वीन'चा प्रयत्न असेल. काही भागां मध्ये स्पर्धक, परीक्षक आणि सू त्रसंचालक वेगवेगळ्या भूमिकेत तु म्हाला पाहायला मिळतील. अर्थात, सगळीच गुपितं मी आत्ता सांगणार नाही. कार्यक्रम प्रेक्षकांनी पाहावा आणि त्याचा मनमुराद आनंद लुटावा. नृत्याबरोबरच इतर अनेक गोष्टींची पर्वणी सगळ्यांसाठी असणार आहे. 'झी युवा'ने ही खास मेजवानी प् रेक्षकांसाठी आणलेली आहे. अद्वै त दादरकर सुद्धा या कार्यक्रमात धमाल आणणार आहे, यातही शंका ना ही. अफलातून मनोरंजन करणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांनी अवश्य पा हावा, हे मी आवर्जून सांगेन.
No comments:
Post a Comment