प्रेक्षकांचं मनोरंजन हेच एकमेव ध्येय उराशी बाळगून झी मराठी या वाहिनीने प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले आहे. येत्या रविवारी म्हणजेच १५ डिसेंबरला झी मराठी प्रेक्षकांसाठी तुझ्यात जीव रंगला, मिसेस मुख्यमंत्री आणि माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकांचे १ तासांचे विशेष भाग सादर करणार आहे.
मिसेस मुख्यमंत्री या मालिकेत अनुराधा आणि सुमीची नोकझोक प्रेक्षकांना रविवारी संध्याकाळी ७ वाजता १ तासाच्या विशेष पाहायला मिळेल. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत सध्या एक विलक्षण वळण आलं आहे. गावात काही अनपेक्षित गोष्टी घडत असतानाच लक्ष्मीचं अपहरण होतं. तिला शोधून काढण्यात राणा यशस्वी होईल का? हे प्रेक्षकांना रविवारी रात्री ८वाजता १ तासाच्या विशेष भागात पाहायला मिळेल.
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत प्रेक्षकांनी नुकतंच पाहिलं की राधिकावरील सर्व आरोप दूर होऊन तिने पुन्हा एकदा कंपनीच्या कारोभाराची सूत्र हातात घेतली आहेत. तिच्या कठीण प्रसंगात नेहमी तिच्या मागे सावलीसारखा उभा राहणाऱ्या सौमित्रसोबत तिचं नातं अजून दृढ होतंय. त्यांचा साखरपुडा तर झालाय, पण आता त्यांच्या लग्नाचे वेध सर्वांना लागले आहेत. त्यांच्या लग्नाचा मुहूर्त निघेल का हे प्रेक्षकांना रविवारी संध्याकाळी ९ वाजता पाहता येईल.
तेव्हा पाहायला विसरू नाका आपल्या लाडक्या मालिकांचे एक तासाचे विशेष भाग १५ डिसेंबर रविवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून फक्त झी मराठीवर!!!
No comments:
Post a Comment