Saturday 8 February 2020

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा इतिहासरुपेरी पडद्यावर!_हिंदी- मराठीत चित्रपट निर्मिती

vपुण्यश्लोक अहिल्यादेवींचा इतिहास रुपेरी पडद्यावर!
vपुण्यश्लोक अहिल्यादेवींवर हिंदी - मराठी चित्रपट!
vउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोश्टर प्रकाशित!
v२०२१ च्या दिवाळीत होणार प्रदर्शित!
विविध भाषांमध्ये इतिहासातील विशाल कर्तृत्ववान व्यक्तींवर अनेक आशयसंपन्न चित्रपट निर्माण होत आहेत. प्रेक्षकांकडून या चित्रपटांना उत्स्फुर्त प्रतिसादही मिळत आहे. आपल्या राज्यकारभार आणि न्यायदानात निष्णात असलेल्या इतिहासातील महान कर्तृत्ववान तेजपुंज राणी म्हणजेच "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर". त्यांचा  इतिहास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यातून आजच्या तरुण पिढीला बरेचकाही शिकता येण्यासारखे आहे. इतिहासातील सर्वगुणसंपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर "पुण्यश्लोक प्रॉडक्शन्स" द्वारे निर्माते बाळासाहेब कर्णवर पाटील आणि दिग्दर्शक दिलीप भोसले "पुण्यश्लोक अहिल्यादेवी" या हिंदी आणि मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे. नुकतीच या चित्रपटाचे पोश्टर लॉंच करून घोषणा करण्यात आली.
अहिल्यादेवी अत्यंत बुद्धिमान, प्रखर विचारवंत आणि स्वाभिमानी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. विविध विषयांवर दररोज त्या विपुल विचार विनिमय करायच्या जनतेच्या समस्या ऐकून त्यांची सोडवणूक करायच्या. त्यांनी प्रजेसाठी अनेक कामे केली. त्यांनी केलेल्या महान कार्यामुळे आजही लोक त्यांचे नाव घेतात. धर्म, संस्कृती परंपरा यांचा त्यांनी कायम सन्मान करून आपले साम्राज्य समृद्ध केले. अनेक किल्ले, विश्रामगृहे, विहीरी आणि रस्ते तयार करण्यासाठी त्यांनी सरकारी पैशांचा हुशारीने वापर केला. लोकांसह सण साजरे केले.  केवळ दक्षिण भारतातच नाही तर हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत त्यांनी हे कार्य केले आहे. सोमनाथ, काशी, गया, अयोध्या, द्वारका, हरिद्वार, कांची, अवंती, बद्रीनारायण, रामेश्वर, मथुरा आणि जगन्नाथपुरी अश्या अनेक मंदिरांमध्ये त्यांनी दानधर्म केले. या बरोबरच, त्यांनी लोकांसाठी वाराणसीचा गंगा घाट, उज्जैन, नाशिक, विष्णुपाद मंदिर आणि बैजनाथ या मुख्य तीर्थक्षेत्रांच्या आसपास अनेक घाट आणि धर्मशाळा बांधल्या. मुस्लिम आक्रमकांनी मोडलेली मंदिरे पाहून त्याने सोमनाथमध्ये शिव मंदिर बांधले.
"पुण्यश्लोक अहिल्यादेवी ह्या एक आदर्श माता होत्या, कश्या प्रकारे उत्तम राज्य करावे हा आदर्श त्यांनी घालून दिला आहे., त्यांच्याकडून आजच्या महिलांनी - तरुण पिढीने शिकण्यासारखं आहे. त्यांच्या काळात महिला अशी जबाबदारी पेलू शकतील कि नाही अशी शंका उपस्थित केली जायची. अश्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी एक आदर्श समाजापुढे - देशापुढे ठेवला. ही  माहिती नव्या पिढीला झाली पाहिजे हा निर्णय निर्माते बाळासाहेब कर्णवर पाटील आणि दिग्दर्शक दिलीप भोसले यांनी घेतला हि विशेष उल्लेखनीय बाब आहे. त्यांच्या या धाडसी प्रयत्नांचे मी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कौतुक करतो. त्यांच्या या चित्रपटातून आजच्या युवा पिढीला, महिलांना निश्चित मार्गदर्शन आणि दिशा मिळेल" असे उद्गार नुकतेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काढले. त्यांच्या हस्ते मंत्रालयात या चित्रपटाचे टायटल पोस्टर लॉंच करण्यात आले.
“जगातील अनेक इतिहास प्रेमींना अहिल्यादेवींच्या चरित्राने भुरळ घातली आहे. एका इंग्रज लेखकाने त्यांची तुलना रशियाची राणी कॅटरिना, इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. जगभरातील विचारवंतांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावर विपुल संशोधन केले आहे. विविध भाषांमध्ये त्यांच्यावर साहित्य निर्मिती झाली असली तरीही त्यांचा बहुतांश इतिहास अजूनही दुर्लक्षित आहे. हा दुर्लक्षित इतिहास या चित्रपटातून दाखविण्याचा आमचा प्रयत्न असेल” असे मत दिग्दर्शक दिलीप भोसले व्यक्त करतात.

No comments:

Post a Comment