लेखन-दिग्दर्शनासोबत सुरेश ठाणगे यांच्या अभिनयाचा पैलू दिसणार
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवा ट्रेंड पहायला मिळतोय तो म्हणजे नव्या चेह्ऱ्यांचा. हे नवे चेहरे चित्रनगरीत आपली ओळख निर्माण करू पाहतायेत. प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षीही मराठी चित्रपटसृष्टीत नवे चेहरे दिसणार आहेत. आगामी ‘बायको देता का बायको’ या चित्रपटातून सुरेश ठाणगे हा नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे अभिनयासोबत या चित्रपटाच्या लेखन- दिग्दर्शनाची जबाबदारी सुद्धा सुरेश ठाणगे यांनी सांभाळली आहे. आपल्या सारख्याच अनेक नव्या चेहऱ्यांना या चित्रपटातून सुरेश यांनी संधी दिली आहे. वाय डी फिल्म्स ची निर्मिती असलेला हा विनोदी चित्रपट २१ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कलेची आवड असलेल्या नगर जिल्हयातील आदर्श गाव हिवरे बाजार येथील सुरेश यांना आपल्यातील आवड स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या मेहनतीने धडपडीतून त्यांनी छोटी-मोठी कामे सुरु केली. त्या प्रयत्नातूनच त्यांनी वेगवेगळ्या अल्बम मध्ये काम केली. लेखन व सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी घेत अनुभवाची शिदोरी ते गोळा करत होते. त्यांच्या या अथक मेहनतीमुळे त्यांनी आपल्या स्वत:च्या चित्रपटाचे स्वप्न साकार केले आहे. मुळात लग्न ठरणं आणि ते होणं ही प्रोसेस सध्या इतकी कठीण झाली आहे. हल्ली लग्नाच्या बाजारात तुमची किंमत कशावरून होईल हे सांगता येत नाही हाच धागा पकडून ‘बायको देता का बायको’ चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे. अवतीभवती घडत असणाऱ्या प्रश्नांकडे बघण्याचा सजग दृष्टिकोन देणारा हा चित्रपट असल्याचे मत लेखक दिग्दर्शक सुरेश ठाणगे यांनी व्यक्त केले.
‘बायको देता का बायको’ चित्रपटात सुरेश ठाणगे यांच्यासह सुनील गोडबोले श्वेता कुलकर्णी, आरती तांबे, अभिलाषा पाटील, प्रतीक पडवळ, सिद्धेश्वर झाडबुके, किशोर ढमाले, अमोल पठाडे, प्रीतम साळुंखे, हनुमंत गणगे, प्रमिला जगताप, वैष्णवी अनपट, वैशाली जाधव, राणी ठोसर, प्रशांत जाधव, महादेव सवई, अश्विनी वाव्हळ, संगीता कोठारी या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. धनंजय रामदास यमपुरे यांनी या चित्रपटाचे निर्माते असून सहनिर्माते संभाजी पडवळ, त्रिंबक सुरवसे, जनाबाई देवकर, अमोल नवले, विलास शिंदे, रोहिणी कसबे, गणेश तोंडे, नितीन गावडे, महादेव घरत, गणेश काळे, अनिल फडके आहेत.
No comments:
Post a Comment