Wednesday 5 February 2020

मंगेशने घेतले मालवणी भाषेचे धडे

वैविध्यपूर्ण भूमिका साकारून अवघ्या महाराष्ट्रावर आपली छाप पाडणारे चतुरस्त्र अभिनेते मंगेश देसाई लवकरच आता एक वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. आजवर त्यांनी प्रेमकथा, विनोदी, कौटुंबिक, रहस्यमय, चरित्रपट अशा विविध धाटणीच्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. आता मंगेश एका सत्य घटनेवर आधारित 'हाजरी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मंगेश एका बीएमसी कर्मचाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी मंगेशने खूप मेहनत घेतली असून त्यासाठी त्याने चक्क मालवणी भाषेचे धडे देखील घेतले आहेत. या चित्रपटातील रत्नाकर जाधव या व्यक्तिरेखेसाठी मंगेशनी मालवणी भाषा आणि त्याचा लहेजा शिकला. या चित्रपटात प्रेक्षक मंगेशला मालवणी भाषेत संवाद म्हणताना पाहू शकतील. त्याचसोबत बीएमसी कर्मचाऱ्यांची भूमिका निभावण्यासाठी मंगेशने खऱ्या आयुष्यातील कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्याच्या भूमिकेचा खूप जवळून अभ्यास केला. या चित्रपटातून मंगेश प्रेक्षकांसाठी नवीन काहीतरी घेऊन येतोय असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. या चित्रपटात तेजश्रीची भूमिकाही तितक्याच ताकदीची आणि निर्भीड आहे. त्यामुळे या दोनही कसलेल्या कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणे, ही पर्वणीच ठरणार आहे. त्यामुळे पाहायला विसरू नका हाजरी रविवार ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त झी टॉकीजवर.

No comments:

Post a Comment