‘बायको देता का बायको’ या चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यासंदर्भात व चित्रपटाबाबत झालेल्या गैरसमजाबाबत खुलासा देण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना दिग्दर्शक सुरेश ठाणगे यांनी चित्रपटाबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचे सांगत झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे.
प्रामाणिकपणे हा चित्रपट सर्वांपर्यंत पोहचावा अशी आमची इच्छा आहे. या चित्रपटातून कोणाचीही बदनामी करण्याचा हेतू नसून सद्यस्थिती दाखवली आहे. आम्हाला झालेली मारहाण पूर्वग्रह मनात ठेवून झाली असल्याचे आम्हाला समजले. ज्यांच्यामुळे हा प्रकार आमच्यावर ओढवला त्या मुलांच्या पालकांनी आम्हाला तकार न करण्याची विनंती केली. ज्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आम्ही हा चित्रपट केला त्याच मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही या हल्ल्याची पोलिसात तक्रार दाखल केली नाही, असं सांगत उगाच गैरसमज पसरवून चित्रपटाचे नुकसान न करता प्रत्येकाने हा चित्रपट आधी नक्की पहावा असे आवाहन निर्माता-दिग्दर्शकांनी केले आहे. आम्हाला चित्रपटातून नक्की काय सांगायचे आहे ते जाणून घ्यावे अशी विनंती दिग्दर्शक सुरेश ठाणगे व निर्माते धनाजी यमपुरे यांनी या पत्रकार परिषदेत केली.
No comments:
Post a Comment