‘क्रिकेटसाठी’ जीव झाला येडापिसा!
मुंबई ३ फेब्रुवारी, २०२० : क्रिकेट ज्यांना आवडत नाही असे कमीच असावेत... क्रिकेट हा आपल्या सगळ्यांचा आवडता खेळ... त्यात जर भारताची कुठली मॅच असेल तर आपण सगळी काम सोडून, जिथे कुठे असू आपल्या सगळ्यांचं लक्ष असते स्कोअरवर... सगळ्यांची एकच इच्छा असते आणि ती म्हणजे भारतानं मॅच जिंकवावी... सगळीकडे उत्सुकतेचे वातावरण असते... असच काहीसं वातावरण होतं कलर्स मराठीवरील ‘जीव झाला येडापिसा मालिकेच्या सेटवर... नुकताच भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी-२०चा सामना रंगला आणि या सामन्याची उत्सुकता सेटवरील कलाकारांपासून सगळ्यांमध्ये दिसून आली... मालिकेच्या संपूर्ण टीमने हे सामने सेटवर पाहिले आणि तेंव्हा सेटवरील वातावरण काही वेगळेच होते... सेटवर शिवाची भूमिका साकारणारा आपल्या सगळ्यांचा लाडका अशोक फळदेसाई, सिध्दी म्हणजेच विदुला चौघुले, सोनी म्हणजेच शर्वरी जोग हे कलाकार आणि संपूर्ण युनिट क्रिकेटचा आनंद घेत असताना दिसत आहेत... सगळ्यांचे लक्ष वेधले आहे भारताच्या स्कोअरवर... सगळ्यांनी सिनमधून वेळातवेळ काढून हा सामना पाहिला... ऐरवी सगळे कलाकार त्यांच्या शोट्स मध्ये व्यस्त असतात... पण, अशा क्षणी मात्र सगळे एकत्र येऊन मज्जा, मस्ती करतात...
या सामन्या दरम्यान टिपलेले हे चित्र ज्यामध्ये ‘जीव झाला येडापिसा’ मालिकेची टिम दिसत आहे, जी सामना बघण्यामध्ये गुंग आहे...
No comments:
Post a Comment