Friday, 7 February 2020

Zee Marathi - Alimili Gupchili


अळीमिळी गुपचिळीमध्ये येणार अभिजीत गुरु आणि अद्वैत दादरकर
आपण अनेक चॅट शो पाहिले आहेत ज्यात कलाकार मंचावर येऊन दिलखुलास गप्पा मारतातअशा कार्यक्रमांमधून कलाकारांचे विविध पैलू प्रेक्षकांच्या समोर येतातझी मराठीने नुकताच प्रेक्षकांसाठी सादर केलेला अळीमिळी गुपचिळी हा चॅट शो ज्यात कलाकार त्यांच्या मुलांसोबत सज्ज होतात या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेयअभिनेता अतुल परचुरे या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहेतअभिनेत्री स्नेहलता वसईकर आणि चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल या पर्वाचा उपविजेता अर्णव काळकुंद्री देखील अतुलला उत्तम साथ देत आहेत.
या आठवड्यात अळीमिळी गुपचिळीच्या मंचावर माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय कार्यक्रमाचा लेखक आणि त्यात केडीची भूमिका निभावणार अभिजीत गुरु हा त्यांची पत्नी समिधा गुरु आणि त्याच्या मुली सोबत सज्ज होणार आहेत्याचसोबत या कार्यक्रमातील सौमित्र म्हणजेच अभिनेता अद्वैत दादरकरत्याची पत्नी भक्ती आणि मुलगी मीरा सोबत या मंचावर हजेरी लावणार आहेतअभिजित गुरु याची मुलगी सुप्रसिद्ध सिनेमा अशी ही बनवा बनवी मधील एक प्रसंग सादर करणार आहेतर मीराचा निरागसपणा प्रेक्षकांना नक्कीच तिच्या प्रेमात पडणार आहेमीरा गल्लीबॉय चित्रपटातील एक रॅप सॉंग गाणार आहेया दोन्ही मुली या मंचावर काय काय धमाल करतात हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका अळीमिळी गुपचिळी शुक्रवार शनिवार रात्री .३० वाजता फक्त झी मराठीवर

No comments:

Post a Comment