Saturday, 6 June 2020

Zee Yuva | 'प्रिया आणि उमेश'ची खुमासदार केमिस्ट्री!!!


या जोडीच्या संसाराला, 'आणि काय हवं'!!! 
प्रिया बापट आणि उमेश कामत, या जोडीचे अनेक चाहते आहेत. दोघेही उत्तम कलाकार आहेत. या हिट जोडीला ऑनस्क्रीन पाहण्याची संधी 'झी युवा' वाहिनीवर मिळणार आहे. रविवारी, ७ जूनला, दुपारी १२ वाजता, 'आणि काय हवं' ही लघुमालिका प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 
लॉकडाऊनमुळे सध्या घरीच असलेले प्रिया आणि उमेश, रोजच्या दिनक्रमात खूप व्यस्त आहेत. खा-प्या, घरातील कामं करणं, वाचन करणं आणि योगा आणि वर्कआऊट या सगळ्यामध्ये त्यांचा छान वेळ जातो आहे. हे दोघेही जसं त्यांचं आयुष्य मस्त एन्जॉय करत आहेत, तसंच 'आणि काय हवं' या लघुमालिकेतील साकेत आणि जुई यांचंही आहे. या जोडप्याच्या आयुष्यातील गमतीजमती, संवाद पाहताना, प्रत्येकाला आपल्या सुखी संसाराची आठवण होईल. खऱ्या आयुष्यातील या जोडीने, ऑनस्क्रीन सुद्धा खूप धमाल केलेली आहे. त्यांच्यातील केमिस्ट्रीचे उत्तम दर्शन या लघुमालिकेत पाहायला मिळेल. तरुणाईला आपलीशी वाटेल, अशी ही दर्जेदार लघुमालिका रविवारी ७ जूनला 'झी युवा' वाहिनीवर पाहायला विसरू नका. तुमच्या संसारात घडतात, तशाच काही गमतीजमती, 'जुई आणि साकेतच्या आयुष्यात सुद्धा पाहायला मिळतील. 

No comments:

Post a Comment