"एकच राजे… शिव छत्रपती माझे" हे वाक्य सम्पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर सम्पूर्ण जगात अतिशय मानाने घेतले जाते. शिव छत्रपती म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. ऐसा राजा पुनः होणे नाही. याच आपल्या देवाला मानवंदना देण्यासाठी झी टॉकीज ने एका खास सांगीतिक मैफिली चे प्रयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराजांवर आधारित फत्तेशिकस्त या चित्रपटाच्या मेकिंगच्या काही अविस्मरणीय आठवणींना सुद्धा उजाळा मिळणार आहे. ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वा. छत्रपती शिवाजी महाराजांना ही विशेष आदरांजली अर्पण केली जाईल. छत्रपति शिवाजी महाराजांवर आजवर अनेक कार्यक्रम झाले आहेत मात्र 'एकच राजे.. शिव छत्रपती माझे ‘हा कार्यक्रम महाराजांच्या मावळ्यांना वेगळीच स्फूर्ति देईल. या सांगीतिक मैफिली मध्ये पोवाडा, नृत्य, वादन अश्या विविध कला सादर केल्या जाणार आहेत. लता मंगेशकर, अजय अतुल, आदर्श शिंदे, उषा मंगेशकर आणि कुणाल गांजावाला यांच्यासारख्या नामांकित गायकांचे गायन होणार आहे. या व्यतिरिक्त, सिद्धार्थ जाधव, वैभव तत्त्ववादी, वैदेही परशुरामी या लोकप्रिय कलाकारांचा बहारदार नृत्याविष्कार सादर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेल्या पोवाड्यांची झलक झी टॉकीज च्या प्रेक्षकांना मिळणार आहे. नंदेश उमप आणि शाहीर देवानंद माळी आपल्या खास शैलीत पोवाडा सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. तसंच या कार्यक्रमाच्या मध्ये प्रेक्षकांना फत्तेशिकस्तच्या कलाकारांकडून शूटिंग दरम्यानचे काही किस्से आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याकडून महाराजांच्या इतिहासातील काही घटना ऐकायला मिळतील. फत्तेशिकस्त हा चित्रपट कसा घडला आणि त्यासाठी कलाकारांनी केलेली मेहनत देखील प्रेक्षक पाहू शकतील. तेव्हा पहायला विसरु नका ९ ऑगस्ट राजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता ' एकच राजे .. शिव छत्रपती माझे ‘आणि फत्तेशिकस्तचे मेकिंग फ़क्त झी टॉकीज वर !
Zee Talkies to air a one of a kind musical tribute to Chhatrapati Shivaji Maharaj on 9th August
If there is one name that can make any person’s chest swell with pride, it is that of Chhatrapati Shivaji Maharaj. Known for his great valor, innovation of military tactics, Chhatrapati Shivaji Maharaj will be remembered by people forever. Paying a tribute to the great Maratha ruler, with musical mashup ‘Ekach Raje Shiv Chhatrapati Maje’, Zee Talkies will be airing show dedicated to him on 9th August at 12 PM and 6pm.
Over the years, many shows have paid a tribute to the Chhatrapati in various dance performances and singing acts. This one-of-a-kind 3-hour show will be a compilation of all such performances that will include powda acts in addition to the above. Featuring an eclectic mix of renowned veteran singers like Lata Mangeshkar, Ajay and Atul, Adarsh Shinde, Usha Mangeshkar, and Kunal Ganjawala to name a few the medley acts will truly be a musical bonanza. In addition of this, popular actors like Siddharth Jadhav, Vaibhav Tatwawadi, and Vaidehi Parashurami will set the stage ablaze with their power-packed performances. The show would be incomplete if it wouldn’t include a few recitals of the great Chhatrapati Shivaji Maharaj since it was in the Chhatrapati’s era that this form was practiced. Nandesh Umap and Shahir Devanand Mali will mesmerize the viewers with their powda acts.
A bonus to the viewers will be the narration of trivia and telecast of a few behind the scene clips of the historical drama film Fatteshikast. Directed by Digpal Lanjekar, the movie is set during the reign of Chhatrapati Shivaji Maharaj who was ready to go to any extent to establish Swarajya in his kingdom. The World Television Premiere of the movie will air on Sunday 16th August at 12noon and 6 PM only on Zee Talkies.
No comments:
Post a Comment