Wednesday 11 November 2020

‘कॅनेडियन वूड’ चे वन व्यवस्थापन वेबिनार


‘पीईएफसी- एफएससी’ ची पर्यावरणीय संवर्धनासाठी प्रमाणित, शाश्वत वनांमधून लाकूड घेण्याविषयी जनजागृती मोहीम

मुंबई, ११ नोव्हेंबर २०२०: लाकडाचा उपयोग बांधकामांमध्ये करण्याची भारतात समृद्ध परंपरा आहे. अगदी अलिकडील काळात लाकडाचा वापर हा केवळ खांब, तुळया आणि छत या मर्यादीत कारणांसाठीच केला जात असे आज पुन्हा इमारतींमध्ये जोडणी, फर्निचर, दारे, खिडक्या, सजावटीच्या वस्तू आणि बांधकामातील इतर काही कारणांसाठी लाकडाला मागणी वाढू लागली आहे. मुळातच भारतात वनक्षेत्र कमी होऊ लागले आहे. तसेच वनसंरक्षक कायद्यांचा मोठा दबावही येथे आहे. लाकडाला आलेल्या वाढीव मागणीमुळे, भारतातील उपयुक्त वृक्षांची उपलब्धता हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता शाश्वतपणे जोपासण्यात आलेल्या जंगलांमधून उपलब्ध झालेल्या व प्रमाणित असलेल्या ‘कॅनेडियन वूड’ सारख्या लाकडाच्या प्रजाती जबाबदारीने स्वीकारण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

वेबिनारबद्दल बोलताना निर्मला थॉमस, संचालिका, मार्केट डेव्हलपमेंट, एफआयआय म्हणाल्या, ‘’जगातील सॉफ्टवूडचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या बी.सी. कॅनडाची लाकूड उत्पादने आज जगभरात विविध प्रकारे व मोठ्या प्रमाणात वापरली जातात. या लाकडांमध्ये सौंदर्य असतेच, त्याशिवाय सामर्थ्य व टिकाऊपणा यांसारखे बहुमुखी गुणधर्मही असतात, त्यांमुळेच त्यांना मोठी मागणी असते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या लाकडांचे स्रोत हे कायदेशीर आहेत. पीईएफसी (प्रोग्रॅम फॉर द एन्डॉर्समेंट ऑफ फॉरेस्ट सर्फिकेशन) किंवा एफएससी (फॉरेस्ट स्टुअर्डशिप कौन्सिल) यांच्याकडून ही लाकडे प्रमाणित करण्यात आलेली असतात. लाकूड कामाच्या उद्योगामध्ये जसजशी पर्यावरणीय जागरूकता वाढत जाईल, तसतसा अंतिम ग्राहकही पर्यावरणाबाबत जागरूक होत जाईल. कॅनेडियन लाकडाच्या प्रजाती या मुळातच तयार, वर्गीकृत, योग्य आकाराच्या असतात आणि हे लाकूड थेट वापरता येण्याजोगे असते. त्यामुळे लाकूड वापरण्याचा मुद्दा निघतो, तेव्हा याच लाकडाला प्राधान्य देणे योग्य ठरते.’’

‘कॅनेडियन वूड’ या नावाने ओळखली जाणारी ‘एफआयआय इंडिया’ ही कॅनडातील ‘ब्रिटिश कोलंबिया’ ची (BC) सरकारी संस्था आहे. बी.सी. या प्रदेशातील वनसंपत्ती ऑफशोअर बाजारपेठांमध्ये विकण्याचे अधिकार या संस्थेला आहेत. ‘सॉफ्टवूड’चे उत्पादन करणारा हा जगातील सर्वात मोठा प्रदेश आहे. भारतासारख्या तृण-कमतरता असलेल्या देशांना दीर्घकाळ लाकूड पुरवण्याची कॅनडाची क्षमता या पृथ्वीतलावर काही मोजक्याच प्रदेशांमध्ये असेल. भारतीय लाकूड उद्योगाला आपल्या प्रजातींबद्दल माहिती देण्याचे काम ‘कॅनेडियन वूड’ विविध उपक्रमांच्या माध्यमांतून करीत आहे. यांमध्ये आपल्या उत्कृष्ट पद्धती समजावून सांगणे, विविध प्रजातींचे उपयोग करण्याविषयी सहकार्याने काम करणे आणि कॅनडातील बी.सी.मधील लाकूड उद्योगांशी गाठ घालून देणे असे हे उपक्रम आहेत.

अरुण कुमार बन्सल यांनी केले. ते ‘पीसीए डब्ल्यूजी एनसीसीएफ’ (एनसीसीएफ-पीईएफसी) या संस्थेचे अध्यक्ष, यांनी ‘कस्टडी सर्टिफिकेशन’ च्या साखळीच्या यंत्रणेबद्दल माहिती दिली. या यंत्रणेमुळे प्रमाणित जंगलातील लाकूड कोणत्याही ठिकाणी वापरले गेले, तरी पुरवठा साखळीच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्यास मदत होते. त्यांच्या सादरीकरणात ‘पीईएफसी’चा विशिष्ट आणि विस्तृत संदर्भ देण्यात आला. पीईएफसी हे लाकडांसाठी देण्यात येणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्रांपैकी एक आहे.

‘एफआयआय’ चे कंट्री डायरेक्टर प्रणेश छिब्बर हे वेबिनारवर बोलताना म्हणाले, “लाकडाविषयीचे प्रमाणपत्र हा एक अतिशय महत्त्वाचा मापदंड आहे. याच्या माध्यमातून आर्किटेक्ट, विकसक, उत्पादक आणि कंत्राटदार यांना आपल्या प्रकल्पांमध्ये वापरण्यात येणारे लाकूड हे शाश्वत व्यवस्थापित जंगलांमधून कायदेशीररित्या मिळवले जाते, याची खात्री पटेल. त्या अनुषंगानेच हे वेबिनार घेण्यात येत आहेत. ‘पीईएफसी’ची संलग्न संस्था असणाऱ्या ‘एनसीसीएफ’ मार्फत भारतात प्रमाणपत्राविषयी जागरुकता निर्माण करण्याचे कार्य ज्येष्ठ वनीकरण व्यावसायिक व दिग्गज असे अरुण कुमार बन्सल हे करीत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. ‘द प्रोग्रॅम फॉर द एन्डॉर्समेंट ऑफ फॉरेस्ट सर्टिफिकेशन’ (पीईएफसी) ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील ना-नफा तत्वावर चालणारी, बिगर सरकारी संघटना आहे. स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा येथे तिचे मुख्यालय आहे. स्वतंत्र तृतीय-पक्षाच्या प्रमाणपत्राद्वारे शाश्वत वन व्यवस्थापनास ती प्रोत्साहन देते. वन प्रमाणनात कॅनडा हा देश जगात अग्रेसर आहे आणि बी.सी. कॅनडा येथील बहुसंख्य वने ही ‘पीईएफसी प्रमाणित’ आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.”

वेबिनार पाहण्यासाठी पुढील लिंक उघडा - https://youtu.be/dQjHpIznFNg

No comments:

Post a Comment