Friday, 6 November 2020

Zee Vajwa - Bhavdyachi Chavdi

 

दिवाळी होणार ब्लॉकबस्टर! ‘झी वाजवा’ वाहिनीवरील ‘भावड्याची चावडी’ कार्यक्रमाच्या दिवाळी विशेष भागात येणार सिध्दार्थ जाधव!
/
‘झी वाजवा’वरील ‘भावड्याची चावडी’ कार्यक्रमाच्या दिवाळी विशेष भागात सिध्दार्थ जाधव करणार दुप्पट मस्ती आणि धमाल!
नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘झी वाजवा’ या मराठी संगीत वाहिनीवरील ‘भावड्याची चावडी’ या धमाल विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा आवाका कितीतरी पटीने वाढविला आहे. चावडी ही अशी एक जागा आहे, जिथे कटिंग चहा घेत मित्र एकत्र जमतात आणि गप्पा मारतात. या गप्पांमधून त्यांच्यातील मैत्रीचे नाते अधिकच घट्ट होते. या वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी चावडीचा माहोल निर्माण केला असून त्यास उदंड प्रतिसाद लाभला आहे. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजनाचा नवा खजिना उपलब्ध झाला असून या कार्यक्रमाचा सूत्रधार पार्थ भालेराव मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांना या चावडीवर गप्पा मारण्यासाठी आमंत्रित करतो.
दर आठवड्यास प्रेक्षक आणि या कार्यक्रमात सहभागी झालेले पाहुणे कलाकार या चावडीवरील धमालमस्ती अनुभवतात. पण ‘भावड्याची चावडी’च्या या आठवड्याच्या भागात दुहेरी धमाल होणार आहे; कारण मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता सिध्दार्थ जाधव त्यात सहभागी होणार आहे. मिश्कील उत्तरे देण्याबद्दल सिध्दार्थ विख्यात असल्याने त्याच्या चित्रपटांप्रमाणेच या आठवड्यातील ‘चावडी’चा हा भागही ब्लॉकबस्टर असेल, यात शंका नाही! या दिवाळी विशेष भागात सिद्धार्थने चावडीवर मजा-मस्ती तर केलीच पण इतकेच नव्हे, तर आपल्या अफलातून नृत्यकौशल्याने तो प्रेक्षकांना थक्क करून सोडणार आहे. शिवाय कार्यक्रमातील कलाकारांबरोबर तो काही धमाल क्षणही अनुभवणार आहे.
‘चावडी’च्या या दिवाळी विशेष भागात सहभागी होण्याची संधी मिळाली याबद्दल सिध्दार्थ जाधवने सांगितले, “भावड्याच्या चावडीवर येऊन आणि भावड्या व त्याच्या मित्रांशी मनसोक्त गप्पा मारून मला खूप मजा आली आणि मी या चावडीवर घालवलेला प्रत्येक क्षण खूप एन्जॉय केला. हा दिवाळी विशेष भाग पाहताना प्रेक्षकांच्या घरी हास्यस्फोट होईल आणि प्रेक्षक देखील हा भाग एन्जॉय करतील याची मला खात्री आहे.
येत्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजता ‘भावड्याची चावडी’चा हा दिवाळी विशेष भाग पाहण्यास विसरू नका फक्त ‘झी वाजवा’ वाहिनीवर
Here is the link for the promo - https://we.tl/t-2ncgQHr8AE

It’s a Blockbuster Diwali! Siddhartha Jadhav to be seen on the special episode of Bhavdyachi Chavdi on Zee Vajwa 

Or 

Siddhartha Jadhav to double the masti and dhamal on Diwali special episode of Bhavdyachi Chavdi on Zee Vajwa 

The newly launched Marathi music channel - Zee Vajwa has upped the entertainment quotient manifolds by launching a power packed comedy show ‘Bhavdyachi Chavdi’. ‘Chavdi’ in marathi is a set up where friends get to socialize over a cup of chai and create strong bonds. The channel is recreating this mahaul on television for its viewers and getting tremendous response. Providing the viewers with a wholesome dose of entertainment, the host of the show Parth Bhalerao welcomes popular celebrities from the Marathi entertainment industry to have a fun chat with them. 

Every week the viewers and the celebrity guests witness the madness on this chavdi. But it's double the fun on this week's episode of Bhavdyachi Chavdi, as popular funny man Siddhartha Jadhav will be seen making an appearance on the show. Given Siddhartha’s habit of coming up with witty replies, it won’t be wrong to expect that this episode will be a blockbuster, just like his movies. Siddhartha not only enjoyed being on the show but will also be seen entertaining the audience with his amazing dance moves. He can be seen spending some hilarious moments with the cast of the show. 

While sharing his excitement on being a part of the chavdi, Siddhartha said, "It was fun to chat with these youngsters and the entertainment quotient only soared with each passing minute that I spent on this chavdi. I hope the viewers will also have a blast watching this Diwali special episode which will be a complete laughter riot." 

Don’t forget to watch Bhavdyachi Chavdi this Saturday at 7pm only on Zee Vajwa


No comments:

Post a Comment