हा आहे देवदत्तचा प्रोटीन सोर्स
अभिनेता देवदत्त नागे हा त्याच्या उत्तम अभिनयासोबतच त्याच्या फिटनेससाठी सुद्धा चर्चेत असतो. डॉक्टर डॉन या मालिकेतील त्याच्या देवा या व्यक्तिरेखेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील भूमिकेसाठी देवा त्याच्या फिटनेसकडे अजून कटाक्षाने लक्ष देत आहे. डॉक्टर डॉन मालिकेचं चित्रीकरण कर्जतमध्ये सुरु आहे त्यामुळे मालिकेची संपूर्ण टीम तिकडेच राहतेय. तिथे निसर्गाच्या सानिध्यात देवदत्त करत असलेल्या ग्रीन वर्कआउटची बरीच चर्चा झाली.
वर्कआउटसोबतच महत्वाचं असतं ते म्हणजे योग्य डाएट. देवदत्तचा सकस आहाराकडे देखील तितकाच कल आहे. परिपूर्ण व्यायामानंतर योग्य प्रोटीन शरीराला मिळावं म्हणून देवदत्तने सेटवर स्वतः चिकन बनवलं. तसा फोटो देखील देवदत्तने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि चिकन लेग पीस हा प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे असं देखील त्याने त्यात म्हंटल आहे. देवदत्ताचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. मालिकेद्वारे तो रोज प्रेक्षकांचं मनोरंजन तर करतोच पण त्याच्या फिटनेसबद्दल गोष्टी शेअर करून तो अनेकांना प्रोत्साहित देखील करतोय.
No comments:
Post a Comment