Tuesday, 1 December 2020

मुंबई सिटी एफसी संघासाठी तयार केलेल्या भित्तिचित्राने केले चाहत्यांना जवळ

मुंबई / गोवा १ डिसेंबर २०२०:हिरो इंडियन सुपर लीगच्या २०२०/२१ मोसमातील आपल्या पहिल्या होम मॅचच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई सिटी एफसीने आपल्या मुंबई शहर आणि त्यांच्या चाहत्यांचे खास आभार मानताना एका वैशिष्ट्यपूर्ण भित्तिचित्र आणि मोठ्या बॅनरचे अनावरण केले. यावेळी मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यांनी अभिनेता आणि संघाचा सहमालक रणबीर कपूरसह छायाचित्रासाठी खास पोझही दिली. 
कोरोनाच्या संकटकाळात यावर्षी आयएसएल ही गोवा या एकाच केंद्रावर सुरु आहे. आपल्या संघाला प्रेरित करण्यासाठी चाहते घरातूनच विविध प्रयोग करीत आहेत. पहिल्या होम मॅचसाठी मुंबई सिटी एफसी संघाने शहरात खास दोन ठिकाणी ही भित्तिचित्र उभारली असून ती चाहत्यांची लक्ष वेधून घेत आहेत. ही भित्तिचित्र मुंबईतील तान्या ईडन हिने तयार केली असून यातील एक मुंबईतील अंधेरी क्रीडा संकुलात तर, दुसरे गोवा येथे उभारण्यात आले आहे.  
ही भित्तिचित्र खास विषय देऊन तयार करण्यात आली आहेत. खिलाडूवृत्ती, समर्पण आणि धैर्य यांचे एकत्रित महत्व काय असते हे या भित्तिचित्रामधून मांडण्यात आले आहे. मुंबईतील गगनचुंबी इमारती, भव्यदिव्य होर्डिंग्स आणि सुंदर सागरी किनारा हे नेहमीच सर्वांचे आकर्षण ठरतात. विशेष म्हणजे येथील चाहत्यांच्या राहणीमानातून खिलाडूवृत्ती, समर्पण आणि धैर्य दिसून येते. नेमकी हीच भावना या भित्तिचित्रामधून मांडण्यात आली आहे. गेले काही महिने हे शहर कोरोनाच्या साथीची झळ सोसत आहेत. या संकटकाळातही येथील रहिवाशांची आरोग्यसेवा करणारे, सुरक्षा कर्मचारी, डबेवाले यांच्या अथक आणि नि:स्वार्थी योगदानामुळे हे शहर आजही आपले तेच अस्तित्व टिकवून आहेत. अशा या विशेष मुंबई शहराचे प्रतिनिधित्व केल्याचा मुंबई सिटी एफसीला अभिमान वाटतो.
या बरोबरच गोवा येथे साकारलेला बॅनर, चाहत्यांच्या मैदानावरील उपस्थिती आणि त्यांच्याकडून खेळाडूंना मिळणारी ऊर्जा याची प्रचिती देतो. आजच मुंबई सिटी एफसी संघ आयएसएलच्या नव्या मौसमातील पहिला होम सामना ईस्ट बंगालविरुद्ध खेळेल, तेव्हा खेळाडूंमध्ये हीच भावना निर्माण होईल. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील भागातील वातावरण या भावनेला मूर्तरूप देतात. त्याच्या निष्ठावंत चाहत्यांनी त्यांच्या घरात राहून सुरक्षा बाळगून संघाला समर्थन केले, तर खेळाडूं उत्साही होतात. जेव्हा खेळाडू मुंबई सिटी एफसी संघाची जर्सी घालून मैदानात उतरतात, तेव्हा ते मुंबईकरांचे प्रेमच परिधान करून खेळत असतात, असे वाटते. त्यामुळे ते पूर्वीपेक्षा चाहत्यांच्या अधिक जवळचे वाटते. 
यावेळी उपस्थित मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे म्हणाले की, "मुंबई सिटी एफसी हा आपला संघ आहे आणि देशांतील सर्वात मोठ्या क्लबपैकी एक आहे. माझ्यासह तुम्ही सर्व चाहते आपल्या मुंबई सिटी एफसी संघाच्या सैदैव पाठीशी राहाल आणि त्यांच्या विजेतेपदासाठी प्रार्थना कराल यात शंकाच नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या चेहरयावर हास्य उमटणार आहे. मुंबईकर आणि खेळाडूंच्या खेळभावनेचे भित्तिचित्राचे  अनावरण  करताना मला आनंद वाटतो. मी या मौसमासाठी संघाला शुभेच्छा देतो."
सहमालक रणबीर कपूर म्हणाले की, "मुंबई सिटी एफसी संघ हा मुंबई या सुंदर शहराची नस आहे. दरवर्षी चाहत्यांकडून मिळणारा प्रतिसाद उस्त्फुर्तच असतो. यावेळीहि तो मिळेल. हा प्रतिसाद हे प्रोत्साहन आमच्या खेळाडूंसाठी नेहेमीच प्रेरक ठरते. यावेळी कोरोनाच्या संकटामुळे चाहत्यांना केवळ टिव्ही आणि सोशल मिडियावरूनच खेळाचा आनंद घेता येत आहे. या स्थितीतही चाहते भरभरून पाठिंबा देत आहे. खेळातील सर्वात सुंदर खेळ समजल्या जाणाऱ्या फुटबॉलवरील चाहत्यांचे प्रेम आम्हाला त्यांच्या अधिक जवळ घेऊन जात आहे." 
मुंबई सिटी एफसी विषयी 
मुंबई सिटी एफसी हा इंडियन सुपर लीगमध्ये खेळणारा मुंबईतील क्लब आहे. संघाचा लोगो म्हणजे हा मुंबई शहराच्या दृढ निश्चय दर्शविणाऱ्या किल्ल्याचे प्रतिबिंब आहे. लोगोमध्ये दिसणारे सात तारे म्हणजे मुंबई शहरातील बेटांचे प्रतिक आहे आणि या बेटांचे नाव या क्लबला अगदी योग्य ठरते. मुंबई शहराची लाईफ लाईन असणाऱ्या लोकल ट्रेन्स या कोट्यवधी मुंबईकरांना जोडतात.  त्यांचे एक आगळे नाते या प्रवाशांशी तयार झाले आहे. त्यामुळेच  जवळपास २० दशलक्ष नागरिकांच्या हृदयाच्या ठोक्यातून एकच आवाज येतो.

No comments:

Post a Comment