Tuesday, 22 December 2020

‘जय जय स्वामी समर्थ' : कलर्स मराठीवर! २८ डिसेंबरपासून सोम ते शनि : रा. ९.३० वा.


जगाची सावलीमाझी स्वामीराज माऊली : जय जय स्वामी समर्थ कलर्स मराठीवर !

मुंबई २३ डिसेंबर२०२० : वेळेच्या भरधाव अश्वावर आरूढ होण्याची स्पर्धा आजच्या विज्ञान युगात अव्याहत सुरू आहे. जो तो भौतिक सुखांसाठी प्राण पणाला लावून धावतो आहे आणि परिणामी कमालीचा असुरक्षितव्याधीग्रस्ततणावपूर्ण आणि वैफल्यग्रस्त आयुष्य आजचा माणूस जगतो आहे. आजच्या पिढीच्या नशिबी आली आहे अफाट स्पर्धा आणि अवाजवी अपेक्षांचे ओझे... अशावेळी अत्यंत अस्वस्थउद्विग्न मनाला शांततेचीसकारात्मकतेचीआशेची आवश्यकता भासते… संकटकाळी जेव्हा सगळे दरवाजे बंद होतातदिशाहीन व्हायला होतं तेव्हा आपण परमेश्वराचे नामस्मरण करतो. परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रुपात येऊन आपला तारणहार  होईल या विश्वासानेश्रद्धेने आणि भक्तीभावाने. महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीवर असे अनेक थोर संत होऊन गेले ज्यांनी वाट चुकलेलयांना मार्ग दाखवलात्यांचे मार्गदर्शक बनले... त्यांच्या दारी आलेल्या भक्तांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अशाच ब्रह्मांडनायक 'श्री स्वामी समर्थह्यांनी भक्तांना सन्मार्ग दाखवला..."भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" किंवा "अशक्यही शक्य करतील स्वामी" या अमृतमय शब्दांची शक्ती अद्वितीय आहे. असुरक्षित मनालाजीवनाला आश्वस्त करणारी आणि संकल्प पूर्ण करण्याची शक्ती देणारी ही संजीवन वचनं आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे उद्याची शाश्वती नाही  तिथे विशेषत: तरुण पिढीला स्वामी समर्थ आणि त्यांचे तत्वज्ञान दिशादर्शक वाटत आहे... आणि याचे एकमेव कारण म्हणजे त्यांची उपासना कोणालाही कोणत्याही कर्मकांडात अडकवत नाही… नामस्मरण हीच पूजा आणि तोच यज्ञ हे त्यांचे सांगणे आहे. त्यांची वचने लाखो लोकांना आधार देतात… अशाच असाधारण सिध्दपुरुषाचे जीवनचरित्र 'जय जय स्वामी समर्थया मालिकेद्वारे प्रेक्षकांना बघण्याची संधी मिळणार आहे...तेव्हा नक्की पहा 'जय जय स्वामी समर्थ२८ डिसेंबरपासून सोम ते शनि रा. ९.३० वा. आपल्या 'कलर्स मराठीवाहिनीवर. शिरीष लाटकार लिखित या मालिकेची निर्मिती कॅम्सक्लब यांनी केली आहे.

आपल्या भवतालच्या प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहेपरमेश्वराच नाव घेत स्वत: परमेश्वर व्हा असे सांगणारे थोर सिद्धपुरुष अठराव्या शतकात होऊन गेले ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. गाणगापुराचे नृसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाल्यानंतर तब्बल ३०० वर्षांचा काळ उलटला आणि एक दिवस कर्दळीवनात लाकडं तोडणार्‍या एका इसमाच्या हातून कुर्‍हाड निसटली आणि तिथल्या वारुळावर पडली... तिथून रक्ताची धार लागली आणि अडसर दूर केल्यानंतर श्री स्वामी समर्थ प्रकट झाले... इथून खर्‍या अर्थाने प्रवास सुरू झाला... अन्यायाला मोडीत काढत आणि मार्गातल्या असंख्य लोकांचा उध्दार करीतत्यांना उपदेश करीत स्वामी समर्थ कसे सोलापूर येथील अक्कलकोट येथे पोहचले... कशी लोकांना त्यांच्या महानतेची प्रचिती येत गेलीअक्कलकोट येथील चोळप्पाशीसेवेकरी सुंदराबाईअक्कलकोटचे राजे मालोजीरावया भक्तांनी स्वामीलीला अनुभवली आणि कृतार्थ झाले त्यांचे कसे नाते होते आणि या मार्गात आणखी कोणकोणती माणसं श्री स्वामी समर्थांच्या मार्गात आली हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये बघयाला मिळणार आहे. अक्कलकोट येथे स्वामींच्या वास्तव्याने वटवृक्षाखाली दोन दशके चैतन्य ऊर्जा नांदली ती कशी हे देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

मालिकेबद्दल बोलताना लेखक शिरीष लाटकर म्हणाले, "मुळात श्री स्वामी समर्थ हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे .. गेली वीस वर्षं मी स्वामी मार्गात आहे. त्यामुळे मी ज्यांची भक्ती करतो त्या स्वामींची गोष्ट मालिकेच्या रूपात सांगायला मिळणं हा एक आनंददायी अनुभव आहे आणि नुसता आनंदच नाही तर हे आव्हानसुद्धा आहे कारण स्वामी चरित्र अफाट आहे. बावीस वर्षांहून अधिक काळ स्वामी अक्कलकोट मध्ये होते .. तिथे त्यांनी शेकडो लीला केल्या आणि स्वामींच्या त्या प्रत्येक लीलेमागे एक अर्थ आहे... एक शिकवण आहे. आपल्याकडे लोक चमत्कार लक्षात ठेवतात पण त्यामागचं तत्त्व लक्षात ठेवत नाहीत. मी तेच तत्त्व उलगडून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.  मनोरंजक पद्धतीने स्वामींची ओळख करून देण्याचा माझा प्रयत्न आहे ..  एका अर्थाने हे शिवधनुष्य आहे .. आणि ते मी पेलण्याचा प्रयत्न करणार आहे".

मालिकेचे निर्माते राकेश सारंग म्हणाले, “आजच्या घडीला स्वामी समर्थ हे लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे... देश विदेशात त्यांचे भक्त आहेत आणि त्यात ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजची तरुण पिढी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली आहे. मी जेव्हा हा विषय ऐकला - समजून घेतला तेव्हा मला असं वाटलं की स्वामींचं तत्वज्ञान .. त्यांची फिलॉसॉफी जितकी त्या काळात लागू होती तितकीच किंबहुना त्याहून जास्त आजच्या काळात लागू आहे. आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण आयुष्यात मन:शांती आणि सकारात्मकता आणण्याचं काम स्वामीचरित्र करू शकतं. आजच्या काळात तुम्हा आम्हाला पडणाऱ्या कितीतरी अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं स्वामी चरित्रात मिळतात... त्यामुळे आजच्या पिढीला मठामधल्या प्रतिमेमागचे खरे स्वामी कळावेत आणि स्वामी भक्तांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळावा म्हणून मी ही मालिका करायचं ठरवलं. ही मालिका मनोरंजनाबरोबरच खूप काही शिकवण देऊन जाईल असं मला वाटतं .. आणि टीव्ही माध्यमाचा मूळ हेतू तोच आहे ना!"

मालिकेबद्दल बोलताना प्रमुख – मराठी टेलिव्हीजनवायाकॉम18 चे दीपक राजाध्यक्ष म्हणाले, “नवरसांमध्ये भक्तीरस हा पवित्र आणि शांतरस हा सर्व रसांचा राजा मानला जातो. शांत आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी भक्तीमार्ग वाट दाखवण्याचं काम करतो. भारतीय आध्यात्मिक परंपरेत अद्वैताला फार मोठं महत्त्व आहे. 'बाळूमामाच्या नावानं चांगभलंया यशस्वी मालिकेनंतर भक्तीरसाने ओथंबलेली आणि त्याद्वारे रोजच्या जगण्यासाठी विश्वास आणि बळ देणारी 'जय जय स्वामी समर्थही मालिका प्रेक्षकांसमोर सादर करताना विशेष आनंद होतो आहे.

कलर्स मराठीद्वारे आम्ही नेहेमीच वेगवेगळ्या आशयाच्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करत असतो... महाराष्ट्रमध्ये अनेक थोर संत होऊन गेले ज्यांनी समाजामध्ये जनजागृतीचे कार्य केले. यावेळेस आम्ही श्री स्वामी समर्थ यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहोत. श्री स्वामी समर्थ यांचे वैशिष्ट्य हे कीत्यांनी भक्ती आणि उपासना यांची सांगड लीलया घातली आणि ती लोकांना पटवून दिली... भक्तीचा उगम प्रेमातून होतो इतकं सोपं त्यांचं तत्वज्ञान आहे. या मालिकेद्वारे प्रेक्षकांना त्यांचे महात्म्य आणि तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत."

श्री स्वामी समर्थ यांनी भारतभर भ्रमण केले... त्यांचे अनुयायी आज संपूर्ण भारतभर नाही तर जगभर पसरलेले आहेत… हिमालयभारत - चीन सीमाकाशीत्रिविक्रम सरोवर असे भ्रमण करून ते अक्कलकोट येथे स्थिरावले... स्वामी समर्थ यांचं शेकडो वर्षांचं वास्तव्यसुरस लीला आणि उपदेश यांनी भरलेली कथा असामान्य आणि प्रेरणादायी आहे... आजच्या काळात यांनी सांगितलेली तत्त्वंत्यांचे उपदेश असाधारण शक्ती देऊन जातात... आणि हेच अत्यंत महत्वाचे आणि मोलाचे आहे. चांगल्याचा वाईटावर विजय पाहून एक प्रकारचे बळ मिळते... आजच्या विज्ञाननिष्ठ काळात का बरं यांचे तत्वज्ञान धीर देतंया आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत... तेंव्हा नक्की पहा 'जय जय स्वामी समर्थ२८ डिसेंबरपासून सोम ते शनि संध्या. ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

याच दिवसापासून म्हणजे सोमवार२८ डिसेंबरपासून ‘सुखी माणसाचा सदरा’ ही मालिका रात्री १०.३० वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

No comments:

Post a Comment