भरगोस मनोरंजनासोबतच मराठी संस्कृतीचा वारसा झी टॉकीज ही वाहिनी जपतेय. झी टॉकीजवरील 'मन मंदिरा' या किर्तनावर आधारित लोकप्रिय कार्यक्रमाला महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रातील एका उत्तम लोककलेला, एक फार मोठे व्यासपीठ या कार्यक्रमातून मिळाले आहे. विविध नामवंत कीर्तनकार इथे कीर्तन सादर करतात. कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करून त्याचसोबत योग्य शिकवण देणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे.
या कार्यक्रमाने नेहमीच प्रेक्षकांना वेग-वेगळ्या कीर्तनकारांचे कीर्तन ऐकण्याची संधी दिली आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे कीर्तनकार आणि त्यांचे भक्तगण विठ्ठल नामाचा जयघोष करतात व जीवनात मिळालेल्या सुखांबद्द्दल त्याचे आभार मानतात. मन मंदिरा या कार्यक्रमात आता कार्तिकी वारी निमित्त खास कीर्तनाचा आस्वाद प्रेक्षकांना घ्यायला मिळणार आहे. वारकरी संप्रदायात कार्तिकी वारीला अनन्यसाधारण महत्व आहे. या वारीसाठी राज्यासह देश-विदेशातून भाविक येत असतात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारीसाठी भाविकांना एकत्र येण्यास बंदी आहे. पण अशावेळी झी टॉकीज ही वाहिनी त्यांच्या लाडक्या प्रेक्षकांसोबत कार्तिकी वारी साजरी करणार आहे. ज्ञानेश्वर महाराज जळकीकर, तुकाराम महाराज मुंडे, अमृत महाराज जोशी आणि अशा अनेक कीर्तनकारांच्या कीर्तनाचा आनंद प्रेक्षक झी टॉकीजवर मन मंदिरा या कार्यक्रमात घेऊ शकतात. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अभिनेत्री शिवानी बावकर करणार आहे.
त्यामुळे कार्तिकीचा वारीचा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी पाहायला विसरू नका मन मंदिरा संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी टॉकीजवर.
झी टाकी वर मनमंदिरा हा कार्यक्रम सामान्य लोक बघतात यात नवल नाही भारताच्या सीमेवर सैनिक हा कार्यक्रम बघतात आणि या कीर्तना मुळे त्यांना अधिक बळ मिळते ही कीर्तनाची किमया आहे
ReplyDelete