पम्मी तिथे काय कमी??? - अपूर्वा नेमळेकर
टेलिव्हिजनवरील तिच्या पुनरागमनामुळे प्रेक्षक आणि चाहते सुखावले आहेत. ती म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर. अपूर्वा झी युवावरील 'तुझं माझं जमतंय' या मालिकेतून पम्मी या नव्या भूमिकेद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि प्रेक्षक तिच्या या भूमिकेवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
तिच्या या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना अपूर्वा म्हणाली, "पम्मी हि एक विनोदी व्यक्तिरेखा आहे. ती तिच्या विश्वात जगणारी आहे. सगळ्यांचं छान व्हावं असं तिला वाटतं आणि त्यासाठी ती सगळ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी तत्पर असते आणि सगळ्यांना मदत करण्याच्या नादात ती या मालिकेत गम्मत आणतेय." तिची व्यक्तिरेखा मालिकेत खरंच धमाल आणतेय आणि तिची नौटंकी प्रेक्षक एन्जॉय करत आहेत. अपूर्वाने नुकताच मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचा पम्मीचा एक हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या फोटोवर तिने 'पम्मी तिथे काय कम्मी?' असं कॅप्शन लिहिलंय. या फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. खरंच पम्मी तिथे मनोरंजनाची कमी हमखास नाही याची खात्री सर्व प्रेक्षक चाहत्यांना आहे.
No comments:
Post a Comment