Tuesday, 22 December 2020

Zing | Pyar Tune Kya Kiya | मला प्यार तूने क्या किया करायला आवडते कारण ते मला आव्हानात्मक वाटते: शगुन पांडे

अभिनेता शगुन पांडे टेलिव्हिजनवर एक नवीन पात्र रंगवण्यासाठी पूर्ण सज्ज झाला आहे; तो आता झिंग वरील तरूणाईचा आवडता कार्यक्रम प्यार तूने क्या कियाच्या एका भागामध्ये दिसणार आहे. शगुन ह्या कार्यक्रमात वैमानिकाची भूमिका साकारणार आहे. इथे तो त्याच्या चाहत्यांबरोबर आणि प्रेक्षकांबरोबरच काही शेअर करू इच्छितो.
१. तुझ्या प्यार तूने क्या किया मधील भूमिकेबद्दल आम्हाला काही सांग.
मी श्री. सुदेश पिल्लईची भूमिका करत आहे जो दाक्षिणात्य आहे आणि वैमानिक आहे. तो भ्रमंती करणारा आहे आणि ट्रेकवर गेलेला आहे. काही दुर्दैवी घटनांमुळे त्याला एक घर घ्यावे लागते आणि तिथेच खऱ्या कथेला सुरुवात होते. फक्त तीन शब्दात माझ्या पात्राचं वर्णन करायचं तर मी म्हणेन – थंड डोक्याचा, मोहक आणि शोधक माणूस.
२. भागाबद्दल आम्हाला काही सांग.
एका ओळीत जर ह्या भागाचं वर्णन मला माझ्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना करायचं असेल तर मी म्हणेन की ही एक अशी प्रेमकथा आहे जी माया, प्रामाणिकपणा आणि अनुबंधाने ओतप्रोत आहे. जेव्हा दोन पात्रं एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा त्यांच्यात माणुसकीच्या पातळीवर एक मजबूत बंधन असते. मला खात्री आहे प्रेक्षकांना हे बघायला आवडेल. एकंदरीत अनुभव खूपच अप्रतिम राहिला आहे. सेट आनंदी आणि चैतन्यदायी आहे, आणि प्रत्येक जण आमच्या कामगिरीकडे लक्ष ठेवून आहे.
३. तुम्ही जयपुर मध्ये चित्रीकरण करत आहात, मग तुला हे शहर बघण्यासाठी काही वेळ मिळाला का? ह्या शहराबद्दल तुला काय आवडले?
चित्रीकरणाचं वेळापत्रक खूपच धकाधकीचं असल्याने आणि आम्ही चित्रीकरण वेळेत संपवण्याच्या प्रयत्नात असल्याने आम्हाला जयपूर बघण्याची संधी मिळालेली नाही. पण मी ह्या गुलाबी शहराबद्दल खूप काही ऐकले आहे. एका ठिकाणाहून दुसरीकडे चित्रीकरणासाठी प्रवास करत असताना हे चैतन्यदायी शहर मी निरखुन बघत आहे. इकडची माणसं खूपच आत्मविश्वासपूर्ण आहेत. मला आशा आहे की हे सुंदर शहर बघण्यासाठी मला वेळ मिळेल.
४. तुला प्याप्यार तूने क्या किया मधला रोल कसा मिळाला?
माझ्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या वर्षांपासून मी झिंग वरील प्यार तूने क्या किया चा एक भाग आहे. मी सातव्या सिझनमध्ये एका खेड्यातील मुलाची भूमिका केली होती ज्यात मी शिवांगी जोशी बरोबर होतो. मग मी मिर्झा साहेबा कथेचा ही दोन वर्षांपूर्वी भाग होतो, आणि आता मी ह्या कार्यक्रमात परत आलो आहे एका वैमानिकाच्या भूमिकेत, आणि ही माझ्या पात्राच्या आलेखासाठी एक सुधारणाही आहे. मला प्यार तूने क्या किया करायला आवडते कारण ते मला खूपच आव्हानात्मक वाटतं. कार्यक्रमाचे अनेक भाग आहेत ज्यात हृदयस्पर्शी प्रेमकथा असतात, त्यामध्ये मला वेगवेगळ्या पात्रांची भूमिका करायला मिळते, माझे कौशल्य जोखता येते, आणि नवीन कथा सादर करण्यासाठी संधी मिळते.
५. तुझ्यासाठी प्रेम म्हणजे काय?
जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांसोबत राहण्यास तयार असतात आणि सर्व बाह्य घटक जसे की समाज, लोक, जातीव्यवस्था त्यांना महत्वाचे वाटत नाहीत, ते म्हणजे प्रेम. ते सर्व समस्यांविरुद्ध लढतील आणि तरीही अशा आधुनिक काळात एकत्र राहण्याचा मार्ग शोधून काढतील, आणि हेच माझ्यासाठी प्रेम आहे.
६. तरूणांसाठी एखादा नातेसंबंधांचा सल्ला?
मोह म्हणजे प्रेम नाही. जेव्हा तुम्ही मनापासून प्रेमात असता तेव्हा तुमच्या जोडीदारास खास वाटावे म्हणून तुम्ही त्या सर्व लहानसहान गोष्टी एकत्र कराल. जेव्हा तुम्ही खूप वेळ एकत्र घालवत असता आणि जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर नसता तेव्हा तुम्हाला खूपच बेचैन वाटते तेव्हा एक नातं फुलत असतं. एक नातं यशस्वी करण्यासाठी पुष्कळ समजूतदारपणा आणि प्रयत्न असायला हवा.
७. तू कार्यक्रमामध्ये एक साहसी माणूस आहेस. तू वास्तविक जीवनात तुझ्या पडद्यावरील पात्राशी संबंधित आहेस का?
होय. नक्कीच मी खूप साहसी आहे. मला बाहेर जायला आवडते आणि मला प्रवास करायला आवडते. मी एक बाहेर रमणारा माणूस आहे. मागे मी माझ्या मित्रांसह चंदीगड ते लेह, लडाखला रोडट्रीपला गेलो होतो आणि तो एक संस्मरणीय अनुभव होता. मी प्यार तूने क्या किया मधील माझ्या भूमिकेशी पूर्णपणे निगडीत आहे.
८. भूमिका स्वीकारण्याचा निर्णय घेण्यास मदत करणारा एक घटक कोणता?
कोणतीही भूमिका घेण्यापूर्वी मी नेहमीच हे पाहतो की मला काहीतरी नवीन करायला मिळावे आणि काहीतरी आव्हानात्मक असावे. मला स्टार किंवा सेलिब्रिटीऐवजी परफॉर्मर व्हायचे आहे. म्हणून जेव्हा जेव्हा मला परफॉर्म करायला मिळते तेव्हा मी शंभर टक्के प्रयत्न करतो ज्यामुळे मला परिपूर्ततेची जाणीव होते.
९. तू ग्रे, नकारात्मक आणि आता सकारात्मक भूमिका केल्या असल्याने सर्वात जास्त कशास प्राधान्य देतो आणि का
मी सकारात्मक आणि विनोदी भूमिका सुरुवातीला निभावल्या होत्या. मी माझी पात्रं पडताळून पाहिली आणि प्रयोग केले. जेव्हा मी ग्रे आणि नकारात्मक भूमिका सादर करत होतो तेव्हा ती एक मजेदार प्रक्रिया होती, कारण ग्रे आणि नकारात्मक भूमिका तुम्हाला कला सादर करण्यास वाव देतात. मी आधी साकारलेली नकारात्मक पात्रे खरोखरच लोकप्रिय झाली आहेत, म्हणून लोकांना वाटते की मी फक्त या प्रकारची पात्रे केली आहेत, पण मी सकारात्मक पात्रेही साकारली आहेत. एक अभिनेता असल्याने मला वेगवेगळ्या जॉनरमध्ये काम करायला आवडते, आणि लवकरच प्रेक्षकांना प्यार तूने क्या किया मध्ये माझे आगामी पात्र सुदेश पाहायला मिळेल आणि त्यांना ते आवडेल.

No comments:

Post a Comment