Thursday, 14 January 2021

Zee Talkies - Kathayan

 झी टॉकीज कथायण चषक देणार उदयोन्मुख लेखकांना सुवर्णसंधी

/
झी टॉकीज देणार तुमच्यातील दडलेल्या लेखकाला वाव
/
झी टॉकीज देणार तुमची कथा सादर करण्यासाठी अनोखा मंच
तुमच्यामध्ये लेखक दडला आहे का? तुम्हाला तुमची कथा सादर करायची आहे का? तुमच्या लेखणीतून सादर झालेल्या उत्तम कथेला चांगला प्रतिसाद मिळण्याची तुम्ही वाट बघत आहात का? तर आता झी टॉकीज हि वाहिनी तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. झी टॉकीज तुमच्यातील लेखकाला वाव देण्यासाठी घेऊन येत आहे एक अनोखी स्पर्धा 'झी टॉकीज कथायण चषक'. हि स्पर्धा उदयोन्मुख लेखकांसाठी एक सुवर्णसंधीच असून या स्पर्धेतमध्ये सहभागी होण्यासाठी २१ जानेवारीपर्यंत तुमची २,००० शब्दांमधील कथा आणि चित्रपटाची सविस्तर पटकथा talkieskathayan@zee.com या ई-मेल आयडीवर पाठवा. या स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक त्यांच्या एका पेक्षा जास्त कथादेखील पाठवू शकतात.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाठवलेली कथा आणि पटकथा मराठी भाषेतच असणे गरजेचे असेल.तसेच स्पर्धकाने ईमेल मध्ये, कथेचा ३-४ वाक्यांमध्ये सारांश व कथेचा प्रकार जसे विनोदी, ड्रामा, सस्पेन्स वगैरे, हे नमूद करणे गरजेचे असेल. त्यासोबतच तुमचे नाव, पत्ता, संपर्क आणि ई-मेल आयडी ही माहितीदेखील जोडा. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व नियम व अटी http://bit.ly/ZTKCMarathi या संकेतस्थळावर दिलेल्या आहेत. तेव्हा वाट कसली बघताय? लगेचच सहभागी व्हा 'झी टॉकीज कथायण चषक' या स्पर्धेत आणि तुमच्यातील लेखकाला द्या एक उत्तम व्यासपीठ.

4 comments:

  1. This is fabulous, i liked and i have submit my story... Tha k you zee talkies...

    ReplyDelete
  2. आभार...Zee! सर्जनशीलतेला वाव दिल्याबद्दल.

    ReplyDelete
  3. प्रसिध्दी पासून दूर राहिलेल्या अज्ञात लेखकांना झी टॉकीज ने दिलेल्या या अनमोल संधी बद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार.

    ReplyDelete
  4. निकाल लागल्यानंतर प्रत्येक सहभागी लेखकांना झी टॉकीज चे सहभाग प्रमाणपत्र मिळाल्यास खूप आनंद होईल.

    ReplyDelete