Thursday 30 September 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस नववा ! विशाल आणि विकासचा हल्लाबोल एकीकडे पाण्याचा मारा तर दुसरीकडे शब्दांचा !

मुंबई ३० सप्टेंबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून हल्लाबोल हा टास्क सुरु आहे. टीम आणि टीम मध्ये शाब्दिक युध्द चांगलेच रंगले आहे. दोन्ही टीममधले सदस्य प्रामाणिकपणे मेहनत घेताना दिसत आहेत. आज मोटर बाईक बसायला येणार आहेत जय आणि गायत्री. आता विरुध्द टीम जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार यात शंका नाही. बघूया हा टास्क आज कसा रंगणार ? जय आणि गायत्री किती वेळ मोटार बाईक बसू शकतील ? विकास, विशाल, मीनल, आविष्कार, सोनाली आणि सुरेखाताई त्यांना बाईकवरुन उठवण्यात यशस्वी होतील ?

विशाल, विकास, मीनल, आविष्कार साबण्याच पाणी टाकून जय आणि गायत्रीला बाईकवरून उठवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. या टास्कमध्ये ही टीम अजून कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रयत्ंन करणार हे बघूया. टास्क दरम्यान अक्षय आणि विशालमध्ये पडणार वादाची ठिणगी. अक्षयच्या आंगावर पाणी टाकल्याने विशाल आणि अक्षयमध्ये बाचाबाची.. ज्यामध्ये अक्षय विशालला बोलणार आहे “मी दुसर्‍यांच्या डोक्याने नाही खेळत”. आता हा वाद कुठे थांबणार ? पुढे काय होणार ? बघूया आजच्या भागामध्ये.

तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३०. वा. आपल्या कलर्स मराठीवर. 

No comments:

Post a Comment