Friday, 8 October 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस पंधरावा ! कोण होणार पुढील आठवड्याचा कॅप्टन ? टीम B ला मिळाली सुवर्णसंधी !

मुंबई ८ ऑक्टोबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेले “जिंकू किंवा लढू” हे साप्ताहिक कार्य काल संपले. या साप्ताहिक कार्यामध्ये टीम विजयी ठरली. नियमांनुसार या विजेत्या टीमच्या सदस्यांना आठवड्यातील कॅप्टन पदाची उमेदवारी मिळणार आहे. बिग बॉस यांनी घोषित केले या टीममधील सदस्यांनी विचारविनिमय करून दोन सदस्यांची नावे कॅप्टन्सीसाठी द्यावी. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनशीप सोबतच खूप मोठी जबबाबदारी देखील येतेआता कॅप्टन बनण्याचा बहुमान कोणाला मिळणार हे आज कळेलच. टीम मधील सदस्यांनी या विषयावर चर्चा करण्यास काल सुरूवात केली. प्रत्येक सदस्य आपण कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी कसे योग्य आहेत आणि त्यांना इच्छा आहे त्यांनाच उमेदवारी मिळावी हे स्पष्ट करू लागले. जयचे म्हणणे होते मला उमेदवारी मिळाली पाहिजे, मीराने सांगितले मी माझंच नावं पुढे करेन, विशालचे म्हणणे होते कॅप्टन म्हणून मला निवडाव अशी विनंती आहे. पण नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केले आहे टीम एकमताने निर्णय घेण्यास असमर्थ ठरली आहे त्यामुळे आता ही संधी टीम ला मिळत आहे. टीम ला ही सुवर्णसंधीच मिळाली आहे.

आता टीम या संधीचा कसा योग्यपणे वापर करेल ? कोणत्या दोन सदस्यांची नावे पुढे येतील ?  कोण बनेल पुढच्या आठवड्याचा कॅप्टन ? हे बघूया आजच्या भागामध्ये. तेंव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment