Wednesday 27 October 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 28 ! “डायरेक्ट टक्कल कर म्हणायचं” – मीरा बघा मी काय करतो, अख्खा महाराष्ट्र लक्षात ठेवेल... – जय

 

मुंबई २७ ऑक्टोबर, २०२१ : “संयमाची ऐशी तैशी” या टास्कमध्ये डेव्हिल बनलेली टीम एक से बडकर एक युकत्या लढवून देवदूत झालेल्या सदस्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण देवदूत बनलेले सदस्य मात्र संयम राखून त्यांचे कार्य पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. आज जय, मीरा आणि तृप्तीताई प्लॅन करताना दिसणार आहेत. बघूया आज काय काय घणार आहे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये. कोणती टीम विजयी ठरेल ? कोणती टीम हरणार ?

जय मीरा आणि तृप्ती एकेमकांशी संभाषण करताना दिसणार आहेत. जय म्हणाला, केस कापायला सांगायचे नाही करणार ती...मीरा त्यावर म्हणाली मी तेच म्हणते आहे विकास आणि मीनलला सांगायचं. केस वैगरे नाही डायरेक्ट टक्कल सांगायचे नाहीच म्हणणार ते करायला. बाहेर ते येणारच ना... जय तृप्तीताईंशी बोलताना म्हणाला, हिला पहिले तुम्ही बघा कसा टास्क द्यायचा हिच्यासाठी नंतर बघा मी काय करतो, अख्खा महाराष्ट्र लक्षात ठेवेल... तसं काहीतरी करतो. मीरा म्हणाली बाहेरून तू त्रास दे एकाला नक्की... जय म्हणाला विकास आणि मीनल टक्कल नाही करणार... या तिघांच हे संभाषण सुरू असताना स्नेहा मागेच बसली होती... तिला चिडवत जय म्हणला तृप्ती काही बोलू नका...

बघूया या कोणती टीम किती यशस्वी ठरेल ? तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment