Friday 29 October 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 30 ! “Play like a player”– उत्कर्ष


मुंबई २९ ऑक्टोबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज उत्कर्ष, स्नेहा आणि जय एका गोष्टीवर चर्चा करताना दिसणार आहेत. ज्यामध्ये उत्कर्ष त्याचे मत मांडताना म्हणणार आहे “Play like a player”. नक्की ही चर्चा का आणि कशावरून सुरू झाली ? हे आजच्या भागामध्ये आपल्याला कळेलच. पण एवढं नक्की की घरातील सगळीच समीकरण हळूहळू बदलताना दिसतं आहेत. 

तिघांची चर्चा सुरू असताना स्नेहाचं म्हणण जयने उत्कर्षला सांगताना म्हणाला, तिचं म्हणण आहे की मीरा आणि गायत्रीने परत तेच केलं जे त्यांनी सुरेखाताईंच्या वेळेला झाला होतं. तर मी तिला तेचं म्हंटलं की बिग बॉस सगळ्यांना समान संधी देतात.वेट फॉर यूर टर्न. आज जर तू कॅप्टन झालीस तर मग सहा ते सात दिवस बॉल इज इन यूर कोर्ट.” उत्कर्षचे त्यावर म्हणणे आहे “मला काय पटतं सांगू का मी स्पर्धक म्हणून सांगतो, “Play like a player”.

बघूया नक्की हा मुद्दा कशावरुण निघाला ? नक्की मीरा आणि गायत्रीने काय केलं ? कळेलच आजच्या भागामध्ये.

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 30 !

कोणते दोन सदस्य ठरणार शक्तीपदक मिळविण्यासाठीचे उमेदवार? 

मुंबई २९ ऑक्टोबर, २०२१ : सदस्यांना पुन्हा एकदा मिळणार संधी शक्तीपदक पटकविण्याची... काल समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी घरामध्ये जाहिर केले, “जे दोन सदस्य सर्वात आधी बिग बॉसने सांगितलेल्या रूममध्ये पोहचतील ते शक्तीपदक मिळविण्यासाठीचे उमेदवार ठरतील. आणि ती रूम आहे confession रूम...”

बघूया आता कोणते दोन सदस्य ठरणार शक्तीपदक मिळविण्यासाठीचे उमेदवार? बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर

No comments:

Post a Comment