Monday 25 October 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 26 ! “मी सोनालीला कधीच हे सांगत...” – जय “मी एकटी जरी असले ना तरी भरपूर आहे” – स्नेहा

मुंबई २५ ऑक्टोबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जय आणि स्नेहा बरीच मज्जा मस्ती करतात, खेळाबद्दल देखील बोलतात, घरामध्ये कोण कसं वागत आहे त्याबद्दल देखील त्यांची चर्चा होतंच असते. आज देखील जय स्नेहाला सोनाली बद्दल काहीतरी सांगताना दिसणार आहे.

जय स्नेहाला म्हणाला सोनाली जरी विरुध्द टीममध्ये असली तरीदेखील मी सोनालीला कधीच सांगत नाही की विशालसोबत नाही माझ्यासोबत खेळ. तिने आजही मला सांगावमी तिला फक्त एकचं सांगतो की सोनाली तू दिसतं नाहीये, मागे आहेस मग ते गृपमध्ये असो वा गेममध्ये असो. स्वत:वरती विश्वास पाहिजे. कोई रहे ना रहे साथ...हम खंबीर है असं पाहिजे. म्हणून मी डॉक्टरला (उत्कर्षला) म्हणतो आपण दोघे जरी असलो ना तरी आपण भरपूर आहे. विचार नका करू चारजणचं पाहिजे.. स्नेहा म्हणाली “तसाच मी देखील विचार करते, मी एकटी जरी असले ना तरी भरपूर आहे. त्यावर जय म्हणाला मलादेखील काऊंट करत जा तुझ्यासोबत. मला टीममध्ये घेशील तुझ्या, अशी का करतेस नकोय का तुला मी तुझ्या टीममध्ये...” स्नेहा म्हणाली माझी टीमचं नाहीये.... जय म्हणाला आपण टीम बनून जाऊ.”

बघूया काय घडणार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज. बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment