मुंबई २२ ऑक्टोबर, २०२१ : बिग बॉस मराठी सिझन तिसरा मध्ये मीरा आणि मीनलला आज यांना तुरुंगवास होणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केलं - “बिग बॉस आदेश देत आहेत संतोष आपण जेलची चावी घेऊन मीरा आणि मीनल यांना त्वरित जेलमध्ये बंद करावे.” मीरा आणि मीनल यांनी नक्की काय केले, की बिग बॉस यांना हे पाऊल उचलावे लागले. बघूया आजच्या भागामध्ये.
बिग बॉस यांनी नुकतेच विशाल, स्नेहा आणि गायत्री यांना नियमभंग केल्याने पुढील आठवड्यातील घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये थेट नॉमिनेट केले. आता मीरा – मीनलला तुरुंगवास होणार आहे. नक्की काय घडले जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment