Wednesday, 13 October 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस अठरावा “आम्ही विकासला सांगितल होतं...” – जय

मुंबई १३ ऑक्टोबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन कार्य पार पडले. ज्यामध्ये घरातील पाच सदस्य सेफ झाले आणि बाकी सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले. कालपासूनच सुरेखा कुडची सदस्यांवर थोड्या नाराज असल्याचे दिसून येत आहे. जीपमध्ये बसण्याची संधी कोणत्या सदस्याला मिळेल यावरून टीम घेत असलेल्या निर्णयावर काल सुरेखा ताईंनी नाराजी व्यक्त केली आणि म्हणाल्या तुम्ही जे ठरवाल त्याला मी मत देईन. आज देखील जय त्याविषयीच सुरेखाताईंशी बोलताना दिसणार आहे. तो त्याचा मुद्दा मांडणार आहे.

जयने विचारले, “सुरेखाताई तुम्ही का नाही आलात ? तुम्ही येऊन जरी गेला असता तरी चाललं असतं. सुरेखा ताईंच म्हणण आहे, “मी तिथे यायचं, तुम्ही मला उतरवणार. त्यापेक्षा मी तुमच्यापासून दूर राहिलेली बरं ना. जय त्यांना मुद्दा समजावण्याचा प्रयत्न करणार आहे, “तुम्ही चुकीचचं बोलत आहात. सुरूवातीला येणं तुमचा भागच नव्हता. तुम्ही विकासला पण विचारा तो जेव्हा आत आला तेव्हा आम्ही डील केलं होतं याच्यानंतर दादुस येणार आणि नंतर तुम्ही येणार आणि हे डील झालं होतं. हवं तर त्याला आता विचारा आणि अजून एक होतं तुमच्यानंतर परत तो येणार”.

बघूया पुढे काय होतं ? कोणाचं म्हणण खरं आहे, सुरेखाताई कोणावर विश्वास ठेवणार ? तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment