मुंबई ११ ऑक्टोबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरात आज सिझनचा पहिला वाईल्ड सदस्य एंट्री करणार आहे. आणि घरामध्ये जायच्या आधीच बिग बॉस आदिशला खूप कठीण टास्क देणार आहेत. म्हणजे त्याचा खेळ घरात जाण्याअगोदरच सुरू होणार आहे असे दिसून येते आहे. आदिशला पॉवर कार्ड मिळविण्याची संधी बिग बॉस देणार आहेत आणि ती संधी त्याने स्वीकारली देखील आहे. पण त्याच्या बदल्यात घरातील कोणत्याही तीन सदस्यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे. ती म्हणजे बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील तीन सदस्यांना रात्रभर जागून घराचे पहारेकरी बनावे लागणार आहे. आता आदिशने कुठल्या तीन सदस्यांची निवड केली ते आज कळेलच. पण त्यावरून स्नेहा वाघ त्याला टोमणे मारताना दिसणार आहे.
स्नेहा आदिशला म्हणाली, “आल्या आल्या त्रास दिला तुम्ही सगळ्यांना. जसं की आमचे तीन लोकं जखमी केले. त्यावर आदिश म्हणाला “कुठले तरी तीन होणारच होते. जर तू माझ्या जागी असतीस तर काय केलं असत ? स्नेहा म्हणाली “माझी पध्दत वेगळी असती. मी वेगळ्या पध्दतीने डील केलं असंत. म्हणजे माझ्या पध्दतीने मी डील केलं असंत. नॉट नेसेसरी की आपल्या कोणत्या गोष्टीने समोरच्याला त्रास झालाच पाहिजे, त्याचा त्रास कमी करूसुध्दा गोष्टी करू शकतो. आदिश म्हणाला, “ त्या दृष्टीने मी पूर्ण प्रयत्न केला आहे”. बघूया पुढे अजून काय काय घडत ? कोणकोणत्या गोष्टी खटकतात ?
तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment