Tuesday, 22 February 2022

लोकप्रिय 'सेक्रेड गेम्स'ची रहस्यमय उत्कंठावर्धक श्रवणगाथा स्टोरीटेलवर!

श्राव्यसाहित्यात विश्वरूपी मानके निर्माण करणारी जगविख्यात 'स्टोरीटेलनवं क्षितिज पेलण्यात अग्रेसर राहिली आहे. 'सेक्रेड गेम्सया तुफान लोकप्रिय वेब मालिकेची मूळ कादंबरी आता 'श्राव्यरूपातस्टोरीटेलने आपल्या रसिकांसाठी प्रकाशित केली आहे. यापूर्वी स्टोरीटेलने 'वळूया प्रचंड लोकप्रिय चित्रपटाची रंजकदार पटकथा दस्तुरखुद्द अभिनेते लेखक गिरीश कुलकर्णी यांच्या आवाजात प्रकाशित केली होती. या प्रयोगाला मराठी रसिकांनी उदंड प्रतिसाद दिल्याने 'सेक्रेड गेम्स'ची ऑडिओ निर्मिती करण्याचा उत्साह वाढला आहे. 'सेक्रेड गेम्स'च्या ऑडिओबुकलाही रसिक पसंती देतील असा विश्वास स्टोरीटेलच्यावतीने प्रसाद मिरासदारांना वाटत आहे.

काटेकर ही व्यक्तिरेखा माहीत नाही
अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. मग तुम्ही 'सेक्रेड गेम्सपाहिलेलं असो की नसो. ही सुप्रसिद्ध वेब सिरीज ज्या प्रसिद्ध कादंबरीवरून बनवण्यात आलीती कादंबरी आता 'स्टोरीटेलमराठीवर ऐकायला मिळणार आहे. या कादंबरीचा मराठी अनुवाद मृणाल काशीकर यांनी केला असून सुप्रसिद्ध वॉईस आर्टिस्ट कृणाल आळवे यांच्या आवाजात 'सेक्रेड गेम्सभाग १ व २ ची लज्जतदार कहाणी ऐकताना रसिकश्रोते रंगून जातात.

'सेक्रेड गेम्स'ची नव्यानं ओळख करून द्यायला हवी काहोही तीच 'सेक्रेड गेम्सकादंबरी आहेजी तुम्ही अतिशय गाजलेल्या वेब सीरिजच्या रुपात आतापर्यंत स्क्रीनवर पाहिली असेल. तुम्ही 'सेक्रेड गेम्सही वेब सिरीज पाहिलेली असली तरीही पुन्हा ऑडिओ रुपात ती ऐकण्याची एक वेगळीच मजा आहे. आणि जर तुम्ही ती पाहिलेली नसलीतर 'स्टोरीटेलवरऐकताना त्यातला एकूणएक प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर तरंगणार आहे. 'सेक्रेड गेम्स'चा हा भन्नाट ऑडिओ फॉर्म अगदी प्रवास करतानाड्राईव्ह करतानाही आपण निवांत ऐकू शकता! प्रख्यात भारतीय लेखक विक्रम चंद्रा यांची गाजलेली 'सेक्रेड गेम्सही क्राईम थ्रिलर कादंबरी 'स्टोरीटेलमराठी ऑडिओबुक रुपात दोन भागांमध्ये प्रसिद्ध व्हाईस आर्टिस्ट कृणाल आळवे यांच्या आवाजात नक्की ऐका.

'सेक्रेड गेम्सउत्कंठाअधिक न ताणता स्टोरीटेलची फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सचा 'साहित्यश्रवणानंदघेता येईल.

विलक्षण लोकप्रिय 'सेक्रेड गेम्सऐकण्यासाठील लिंक

https://www.storytel.com/in/en/authors/555121-Vikram-Chandra

No comments:

Post a Comment