मुंबई २७ मार्च, २०२२ : रंग नव्या नात्यांचा, सोहळा कुटुंबाचा – कलर्स मराठी अवॉर्डची उत्सुकता प्रत्येकालाच होती. आपलया आडत्या व्यक्तिरेखेला, आवडत्या नायकाला, आणि लाडक्या नायिकेला अवॉर्ड मिळणार की नाही याची वाट सगळेच प्रेक्षक बघत होते. अखेर सगळ्यांची प्रतीक्षा संपली. लोकप्रिय मालिका जय जय स्वामी सामर्थ ठरली तर लोकप्रिय नायकचा पुरस्कार स्वामी समर्थ ही व्यक्तिरेखा साकारणार्या अक्षय मुडावादकर यांना मिळाला. अक्षया नाईक म्हणजेच सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील लतिका लोकप्रिय नायिका ठरली. लोकप्रिय खलनायक सुंदरा मनामध्ये भरली दौलत तर खलनायिका जीव माझा गुंतला मालिकेतील चित्राला मिळाला. लोकप्रिय कुटुंब ठरले चोळप्पा कुटुंब – जय जय स्वामी समर्थ. कथाबाह्य कार्यक्रम ठरला बिग बॉस मराठी ३ आणि सूत्रसंचालक ठरले आपल्या सगळ्यांचे लाडके महेश मांजरेकर. गेले 2 वर्ष आपण एका कठीण परिस्थिला सामोरं जात आहोत पण त्यामध्ये देखील मालिकांनी आपले मनोरंजन करण्याचे सोडले नाही अआणी त्याकरतच मालिकांच्या निर्मात्यांसोबतच संपूर्ण टिमला कलर्स मराठी वाहिनीकडून देण्यात आला “कृतज्ञता सन्मान” . विशेष उल्लेखनीय व्यक्तिरेखा हे अवॉर्ड ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले (राजा रानीची गं जोडी – कुसुमावती) यांना देण्यात आले
No comments:
Post a Comment