Thursday, 3 March 2022

मुंबई शहरामध्ये लाईव्ह परफॉर्मन्सेस, जनसामान्यांसाठी विनामूल्य खुले | एनसीपीएची बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत भागीदारी

“एनसीपीए ॲट  पार्क”

एनसीपीएची बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत भागीदारी

~ 4, 5, 11, 12 मार्च रोजी कूपरेज बॅन्डस्टॅन्ड फोर्ट संध्याकाळी पासून ~

मुंबईः मुंबईची प्रीमिअर कला आणि सांस्कृतिक संस्था नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्‌स (एनसीपीएने बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) सोबत शहरामध्ये लाईव्ह परफॉर्मन्सेस आणि परफॉर्मिंग आर्ट्‌सला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कला उत्साहींचे थिएटर्समध्ये पुन्हा एकदा स्वागत करण्यासाठी एनसीपीए ॲट  पार्क (NCPA@TheParkह्या उपक्रमाची सुरूवात केली आहे.

कूपरेज बॅन्डस्टॅन्ड, फोर्ट, मुंबई येथे मार्च 2022 रोजी आपल्या पहिल्या आवृत्तीची सुरूवात करत एनसीपीए ॲट  पार्क (NCPA@ThePark) मध्ये संगीत, नृत्य आणि कविता अशा क्षेत्रांमधील कार्यक्रमांचा रोमांचक मिलाफ पाहायला मिळेलमार्चच्या पहिल्या दोन वीकेन्ड्‌सना आयोजित केलेल्या हे कार्यक्रम प्रत्येकी एक तासाचे असतील आणि लोकांसाठी विनामूल्य खुले असतीलसध्याच्या कोविड नियमांनुसार, यात प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

 

  • मार्च रोजी आयोजित केलेल्या पहिल्या कार्यक्रमामध्ये एसओआय चेंबर ऑर्केस्ट्रामधील सदस्य हे मोझार्ट जोहान स्ट्रॉस इत्यादी आवडत्या संगीतकारांचे संगीत साजरे करतीलह्या कार्यक्रमामध्ये वॉल्ट्‌झ  मार्चेस, पोल्काज आणि अशा अनेक प्रकारांमधील हलक्याफुलक्या क्लासिकल संगीताची संध्या पाहायला मिळेल.
  • मार्च रोजी बोलल्या गेलेल्या शब्दांचे भारतातील सर्वांत मोठे कलेक्टिव्ह्‌स अनइरेज पोएट्रीतर्फे खास कवितांच्या अंदाजातील कथा सांगण्यात येतीलयात हेली शाहवनिका संगतानी आणि सिमर सिंग यांचा समावेश असेल.
  • पुढच्या आठवड्‌यात, 11 मार्च रोजी वसंत उत्सव ह्या नृत्य सादरीकरणामध्ये अदिती भागवत आणि ट्रूप (लावणी)स्वप्नलोका दासगुप्ता, प्रमुख प्रोग्रामिंग, एनसीपीए आणि एनसीपीए सीएसआर प्रोजेक्ट फॅकल्टीलतासना देवीसर्मिष्ठा चट्टोपाध्यायपुर्बिता मुखर्जी (टागोर डान्सआणि टिना तांबे आणि ग्रुप (कथ्थकयांचा समावेश असेल.
  • 12 मार्च रोजी भव्य समारोपामध्ये हॉलीवूड जॅझ नाईट असेलकोमल कुवडेकर आणि तिचा जॅझ बॅन्ड जॅझसोलफंक आणि आरअॅन्डबीच्या साऊंड्‌ससह संध्या साजरी करतील.

एनसीपीएचे चेअरमन श्री.खुशरू एन संतुक म्हणाले, जागतिक दर्जाची शहरे तिथल्या नागरिकांच्या कला क्षेत्रातील सातत्यपूर्ण सहभागावरून ओळखली जातातअधिकारीक कार्यालयांच्या मदतीने आणि सीएसएमव्हीएसपृथ्वी थिएटरकाळा घोडा आर्ट्‌स फेस्टिव्हल इत्यादींसह आमच्या सहयोगाच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी दर्जेदार परफॉर्मन्सेस आयोजित करण्याचा एनसीपीए येथे आमचा प्रयत्न राहिलेला आहेकडक निर्बंधांमधून नुकतेच मुंबई शहर हळूहळू बाहेर येत असून ह्या उपक्रमासाठी केवळ आमच्या थिएटर्समध्येच परफॉर्मन्सेस पुन्हा सुरू करण्यासाठी नाही तर ते लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी बीएमसीसोबत सहयोग करताना आम्हांला आनंद होत आहेएनसीपीए ॲट  पार्क (NCPA@ThePark)उपक्रमासह लाईव्ह परफॉर्मन्सेसचा आनंद सर्वत्र पसरवण्याची आम्ही आशा करतोत्या आनंदाची जागा अन्य काहीच घेऊ शकत नाही.

ह्या उपक्रमाला आपले समर्थन प्रदान करत मुंबई महापालिका आयुक्त श्रीइक्बाल चहल म्हणालेएनसीपीए ॲट  पार्क (NCPA@ThePark)उपक्रमासाठी एनसीपीएसोबत सहकार्य करताना बीएमसीला अतिशय आनंद होत आहेगेली दोन वर्षे ह्या शहराने कोविडमुळे खूप काही सहन केले आहेह्या उपक्रमासह कलात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह आम्ही मुंबईमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य आणण्याचा प्रयत्न करत आहोत.

मुंबईच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे म्हणाल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण परफॉर्मिंग आणि कला क्षेत्राला मोठा फटका बसलेला आहेआता शहरातील आयुष्य हळूहळू पूर्ववत होत असून शहरातील कला आणि संस्कृतीला समर्थन देण्याचे एनसीपीए ॲट  पार्क (NCPA@ThePark)चे उद्दिष्ट्‌य आहे.

विभिन्न प्रकारांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी एनसीपीएला आपल्या प्रेक्षकांकडून नेहमीच चांगला प्रतिसाद लाभलेला आहे:

तेव्हा एनसीपीए ॲट  पार्क (NCPA@TheParkयेथील

No comments:

Post a Comment