~ आधुनिक आयुर्वेदातील महिलांच्या सन्मानार्थ डिजिटल फिल्मचा शुभारंभ ~
राष्ट्रीय, ८ मार्च २०२२: पंकजाकस्तुरी हर्बल रिसर्च फाऊंडेशन (पीकेएचआरएफ) या आघाडीच्या आधुनिक आयुर्वेद ब्रँडने 'सेलिब्रेटिंग जेंडर इम्बॅलन्स' ही डिजिटल फिल्म सादर केली आहे. अडीअडचणींवर मात करून आधुनिक आयुर्वेदामध्ये कार्यरत असलेल्या व आता या क्षेत्रात आघाडीचे स्थान भूषवणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ पंकजाकस्तुरी हर्बल रिसर्च फाऊंडेशनने ही विशेष डिजिटल फिल्म तयार केली आहे.
पंकजाकस्तुरी हर्बल रिसर्च फाऊंडेशनच्या कर्मचाऱ्यांमध्ये महिलांची आणि त्यांच्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची वाढती संख्या या फिल्ममागची प्रेरणा ठरली.
पंकजाकस्तुरी हर्बल रिसर्च फाऊंडेशनमध्ये सुरुवातीपासूनच महिला कर्मचाऱ्यांचे संख्याबळ अधिक आहे, आज त्यांच्या ७९% डॉक्टर्स व ९०% आरोग्यसेवा कर्मचारी महिला आहेत. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये ८६% विद्यार्थिनी व ६६% महिला शिक्षिका आहेत. डॉ लक्ष्मी नायर, संचालिका - मेडिकल्स, डॉ कस्तुरी नायर - संचालिका, अकॅडेमिक्स, डॉ कावेरी नायर - संचालिका - ऑपरेशन्स आणि डॉ ऐश्वर्या नायर, संचालिका - स्ट्रॅटेजी या चार महिला संचालिकांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल करत असलेले पंकजाकस्तुरी हर्बल रिसर्च फाऊंडेशन आपल्या विविध उपक्रमांमधून महिलांना पाठिंबा देण्यासाठी आघाडीवर आहे.
#BreakTheBias अर्थात पक्षपात मोडून काढा या संकल्पनेवर भर देणाऱ्या या फिल्ममध्ये आजच्या काळात महिला आधुनिक आयुर्वेदाच्या क्षेत्रात कशाप्रकारे आघाडीवर आहेत ते दाखवण्यात आले आहेत. प्राचीन विज्ञानाची आजवरची बऱ्याचशा प्रमाणातील पुरुषी प्रतिमा आता मात्र बदलत असल्याचे या फिल्ममधून दाखवले गेले आहे. पंकजाकस्तुरी हर्बल रिसर्च फाऊंडेशनमध्ये असलेला सकारात्मक लैंगिक पक्षपात नेमका कसा आहे हे दाखवण्यासाठी या फिल्ममध्ये #GenderImbalance साजरा करून उलट मानसशास्त्राचा वापर अतिशय हुशारीने करण्यात आला आहे.
पंकजाकस्तुरी हर्बल रिसर्च फाऊंडेशनच्या संचालिका - स्ट्रॅटेजी, डॉ. ऐश्वर्या नायर यांनी सांगितले, "२००२ मध्ये आम्ही आमच्या वाटचालीला सुरुवात केली, तेव्हापासून आमच्या लक्षात आलेली प्रमुख गोष्ट म्हणजे आयुर्वेदाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक महिलांची संख्या सातत्याने वाढत आहे, डॉक्टर्स असोत, शास्त्रज्ञ असोत किंवा विज्ञानाचे इतर कोणतेही क्षेत्र असो, महिलांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. ज्याठिकाणी आधुनिक आयुर्वेदाच्या क्षेत्रात महिला आघाडीवर राहून यशस्वी कामगिरी बजावत आहेत अशी संस्था असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या क्षेत्रातील मर्यादा मोडून काढून नवी उंची गाठणाऱ्या या महिलांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळते आहे ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. या फिल्ममध्ये आम्ही असमानतेची संकल्पना उलटी करून वापरण्याचे ठरवले आणि पंकजाकस्तुरी हर्बल रिसर्च फाऊंडेशनमध्ये महिलांच्या बाजूने असलेला कल दर्शवून त्याविषयी आम्हाला वाटणारा आनंद व अभिमान आम्ही साजरा करत आहोत. या परिवर्तनाचे आम्ही स्वागत करत आहोत आणि पक्षपात मोडून काढण्यासाठी युवा मुलींना प्रोत्साहन देत आहोत."
महिलांनी आपल्या बहुसंख्येने आपले स्त्रीत्व साजरे करावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे हा या फिल्ममागचा पीकेएचआरएफचा उद्देश आहे.
फिल्म पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा: https://www.youtube.com/watch?
No comments:
Post a Comment