कुमार महाजन आणि सुदर्शन चक्रपाणी यांच्या 'समांतर' आयुष्याची अचाट कहाणी स्टोरीटेलवर!
'मुळात खरं तर माझी इथ येण्याची इच्छाच नव्हती. इथंच काय, या क्षणापर्यंत मी अशा कोणत्याच ठिकाणी कधी गेलो नव्हतो. वाफगावकरनं इतकी मनधरणी केली केली... त्याचं मन मोडायचं नाही, म्हणून केवळ मी आलो होतो' या वाक्यानं कादंबरीची सुरुवात होते आणि उत्सुकता चालवण्याचीही! सुहास शिरवळकर यांची ही आणखी एक कुतूहल चालविणारी कादंबरी 'स्टोरीटेल' मराठी 'ऑडिओबुक'मध्ये घेऊन येत आहे. 'हॉलिडे फिवर'चा आनंद घेणाऱ्या रसिकांना 'स्टोरीटेल'चं हे अनोखं सरप्राईज आहे.
कुमार महाजन चारचौघांसारखा तिशीतला तरुण. छोटासा संसार असलेला. पण त्याची आर्थिक ओढाताण होतेय. कुटुंबाचा खर्च वाढतोय पण पैसे पुरत नाहीत. बायकोच्या माफक अपेक्षा पूर्ण करता येत नाहीयेत, लहान मुलाचे हट्टही पूर्ण करता येत नाहीयेत. त्यात त्याची नोकरी जाते. अशा ओढग्रस्तीच्या परिस्थितीत त्याचा मित्र वाफगावकर त्याला घेऊन जातो एका स्वामींकडे… कुमारचं भविष्य जाणून घेण्यासाठी. कुमारलाही आपलं भविष्य जाणून घ्यायचं आहे. काय असेल कुमारचं भविष्य? मुळात देव, नशीब अशा गोष्टींवर विश्वास नसलेला नास्तिक कुमार, स्वामींनी सांगितलेल्या भविष्यावर कसा विश्वास ठेवतो ? त्याच्या भविष्यात नेमकं काय वाढून ठेवलंय? आणि स्वामींची भविष्यवाणी खरी ठरते का? या साऱ्या प्रश्नांची उकल करणारी, एक जबरदस्त सपेन्स थ्रिलर कादंबरी म्हणजे ‘समांतर’. सुहास शिरवळकर यांची ही गाजलेली कादंबरी आता ऑडियोबुक स्वरुपात अनिरुद्ध दडके यांच्या भारदस्त आवाजात स्टोरीटेलवर प्रदर्शित होत आहे.
स्वामींनी सांगितलेल्या भविष्यावर विश्वास ठेवून कुमार सुदर्शन चक्रपाणीची भेट घेतो का? चक्रपाणी नक्की कोण असतो?, त्याची कुमारला मदत होते की नाही? खरंच भविष्य असं समजतं का? ते आपण ठरवलं म्हणून बदलवता येतं का? या सर्व प्रशांची उत्तरं 'स्टोरीटेल'वर उलघडण्यातच मजा आहे. शिरवळकरांनी कथा इतकी प्रवाहीपणे लिहिली आहे, की त्यात आपण नकळत गुंतून जातो, कादंबरी ऐकताना त्यातील सर्व पात्रं अगदी डोळ्यांसमोर उभी राहतात आणि पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम राहते. तर नक्की ऐका 'समांतर' ऑडियोबुक स्टोरीटेलवर.
सुहास शिरवळकर यांची बहुलोकप्रिय 'समांतर' श्राव्यरूपात ऐकण्यासाठी लिंक - https://www.storytel.com/in/
No comments:
Post a Comment